अहेरी : तालुक्यात मे महिन्यात बांधण्यात आलेले रस्ते आणि कलवट बांधकाम काही महिन्यांतच उद्ध्वस्त झाले असून मोठमोठे खड्डे पडले आहेत.त्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.रस्त्यांच्या या विदारक अवस्थेमुळे प्रशासन व कंत्राटदारांविरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
आविसं,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा.श्री.अजय कंकडालंवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला थेट इशारा दिला आहे.वारंवार फोन आणि पत्राद्वारे कळवूनही विभागाने कोणतीही दखल घेतली नाही.परिणामी निकृष्ट दर्जाचे बांधकाम उघडकीस आले आहे.
अजय कंकडालवार यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की संबंधित कंत्राटदारावर तात्काळ चौकशी करून निकृष्ट काम पुन्हा करून घेण्यात यावे,तसेच त्याला काळ्या यादीत टाकण्यात यावे.अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जाण्यास प्रशासनाने तयार राहावे.
यासोबतच त्यांनी इशारा दिला आहे की, ८ सप्टेंबर २०२५ रोजी गडअहेरी बामणी फाट्याजवळ चक्काजाम आंदोलन छेडले जाईल.त्यामुळे प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी,अन्यथा तीव्र आंदोलन अटळ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
Home मुख्य बातम्या कंत्राटदार व प्रशासनाच्या ढिलाईला कंकडालंवारांचा इशारा : जनतेच्या रोषाला सामोरे जाण्यास तयार...