Home अहेरी काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक अजय कंकडालवार यांनी तोर्रेम कुटुंबाचे सांत्वन पर...

काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक अजय कंकडालवार यांनी तोर्रेम कुटुंबाचे सांत्वन पर भेट व तेरवी कार्यक्रमाला आर्थिक मदत

12
0

अहेरी : तालुक्यातील गुड्डीगुडम ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या जिम्मेला येथील अजय कंकडालवार यांचे कट्टर समर्थक विनोद पोट्टी तोर्रेम यांचे वडील पोट्टी मोंडी तोर्रेम यांची काही दिवसा अगोदर दीर्घ आजाराने निधन झाले होते.या दुःखद घटनेची माहिती मिळताच आज काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी जिम्मेला येथील त्यांची राहते घरी जाऊन तोर्रेम कुटुंबियांचे सांत्वन केले.त्यावेळी तोर्रेम परिवाराला पुढील होणाऱ्या तेरवी कार्यक्रमाला अडचण भासत असलेल्या विषय सांगितले होते.कंकडालवार तोर्रेम कुटुंबाची अडचण बघून तेरवी कार्यक्रमाला आर्थिक मदत केले आहे.

यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,वांगेपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच दिलीप मडावी,गुड्डीगुंडम ग्रामपंचायतचे सरपंच धर्मराज पोरतेट,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,श्रीनिवास राऊत,प्रमोद गोडसेलवारसह स्थानिक कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here