सिरोंचा : सिरोंचा तालुका मुख्यालयातील सिरोंचा – धर्मापुरी गावाकडे जाणारी रस्त्यावरील नगर पंचायत जवळ मुख्यालयात येणारी इसमाने दुचाकीने रस्त्यावर पडून जखमी झाली होती.ही घटनेची माहिती येथील सामाजिक कार्यकर्ता विशाल रंगुवार,शिवा केडामवार, क्रिष्णा राच्छावार,यांनी सामाजिक कार्यात नेहमी सहभागी असणारे मूलकला फाउंडेशनचे प्रमुख – सागर मूलकला यांना भ्रमणध्वनी द्वारे माहिती दिल्याने वेळचे विलंब न करता घटनास्थळी धाव घेत सिरोंचा पोलिसांच्या सहकार्याने उपचारासाठी सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.जखमी इसमाचे नाव – बालकृष्णा कुम्मारी, राहणार – बोगापुर, वय – ३५ असे माहिती मिळाल्याने घटनेची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली आहे.पुढील तपास सिरोंचा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक – समाधान चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक दोत्रे ,पोलीस अंमलदार – अविनाश चव्हाण यांनी करीत आहे.
Home मुख्य बातम्या सिरोंचा नगरपंचायत समोरील रस्त्यावर अपघातात जखमींना सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने रुग्णालयात दाखल