Home मुख्य बातम्या गुंगलू मिच्छा यांना मदतीचा हात – अजयभाऊंच्या तत्परतेने जीव वाचला

गुंगलू मिच्छा यांना मदतीचा हात – अजयभाऊंच्या तत्परतेने जीव वाचला

19
0

भामरागड : तालुक्यातील गुंगलू मिच्छा हे दुर्धर आजाराने ग्रस्त होते.आर्थिक परिस्थिती कमजोर असल्याने ते गावठी उपचारांवर अवलंबून होते.मात्र आजारात काहीही सुधारणा होत नव्हती.त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याची माहिती काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी अजयभाऊंना दिली.

काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार व आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांनी काल भामरागड दौऱ्यावर असताना मर्दमलगा येथे थेट त्यांच्या घरी पोहोचले आणि त्यांची प्रकृती तपासून घेतली.त्यांनी तत्काळ रुग्णालयात उपचार करण्याच्या सूचना दिल्या तसेच आर्थिक मदतही केली.पुढेही मदतीची आवश्यकता भासल्यास त्वरित संपर्क करण्यास सांगितले.

यावेळी लक्ष्मीकांत (बालू) बोगामी – काँग्रेस तालुका अध्यक्ष भामरागड,विष्णू मडावी – उपाध्यक्ष, नगरपंचायत भामरागड,सुधाकर तिम्मा – आ.वि.स. तालुका अध्यक्ष,भामरागड, प्रशांत गोडसेलवार – नगरसेवक नगरपंचायत अहेरी आदी उपस्थित होते.अजयभाऊंच्या या तत्परतेमुळे गुंगलू मिच्छा यांना वेळेत वैद्यकीय मदत मिळून जीव वाचला. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे परिसरात कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here