Home मुख्य बातम्या सुंदरनगर येथील भाजप कार्यकर्त्यांनी धरले काँग्रेसची ‘हात’

सुंदरनगर येथील भाजप कार्यकर्त्यांनी धरले काँग्रेसची ‘हात’

29
0

मुलचेरा : तालुक्यातील सुंदरनगर येथील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या भाजपा पक्षाला रामराम करीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात नुकताच प्रवेश केले.या पक्षप्रवेशात भाजपचे हितेश हलदर,हमीर दास,तनमय बनिक,विजय मजुमदार,मनीषा रॉय,अजय बाला,प्रभान बनिक,राजेश दास,प्रकाश दास,सुजल रॉय,दृवा घोष,अजय विश्वाससह अनेक मुख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या समावेश आहे. त्यांच्या पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे हात धरले आहे.

भाजप कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश काँग्रेसचे अहेरी विधानसभा समन्वयक अजयभाऊ कंकडलवार यांच्या जनसंपर्क कार्यालय अहेरी येथे राज्याचे विरोधी पक्षनेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार व खासदार डॉ.नामदेव किरसान यांच्या नेतृत्वात तर काँग्रेसनेते व गडचिरोली जिल्हा परिषदेचे लोकप्रिय माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार व आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच काँग्रेसचे नेत्या व माजी सभापती सुरेखा आलम व कवड्डजी चलावार रॉय काका यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची काँग्रेसनेते अजयभाऊ कंकडालवा आणि काँग्रेसचे आदिवासी आघाडी जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी यांनी पक्षाचे दुप्पट्टे टाकून व पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत केले.

यावेळी नगरसेवक प्रशांत गोडशेलवार, मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,प्रमोद गोडशेलवार,नरेश गर्गम,स्वप्नील मडावी सचिन पंचार्य ,राकेश सडमेकसह काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here