Home अहेरी लोकमत सखी मंच तर्फे जागतिक महिला दिन,सत्कार समारंभ व मार्गदर्शन शिबीर संपन्न...

लोकमत सखी मंच तर्फे जागतिक महिला दिन,सत्कार समारंभ व मार्गदर्शन शिबीर संपन्न : प्रमुख वक्ते म्हणून माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांची उपस्थिती

22
0

अहेरी : दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जात असतो.मात्र त्या दिवशी कार्यक्रमाची नियोजन चुकल्याने सदरहू कार्यक्रम 27 मार्च गुरुवारला अहेरी येथील प्रसिद्ध असलेल्या वीर ब्रह्महेंद्रस्वामी मंदिर येथील लोकमत संखीमंच तर्फे भव्य सत्कार समारंभ व मार्गदर्शन शिबीर,जागतिक महिला दिन कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार तर प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेसचे नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनालीताई कंकडालवार यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला मार्गदर्शन केले.

यावेळी कार्यक्रमाला मा.विजयभाऊ खरवडे,सुरेखा गोडसेलवार नगरसेविका नगरपंचायत अहेरी,शालिनी पोहोंनेकर नगरसेविका नगरपंचायत अहेरी,पूर्वाताई दोंतुलवार,वनिता खरवडे,कांता मडावी,रवी भांदकवर,संगीता बुरांडे,किरण भांदकर,संगीता कांडूरवार,वर्षाताई,नंदाताई मद्दीवार,रूपा गद्देवार,पूनम कोंडलेवार,कविता मडावी,प्राजक्ता वरठे,अर्चना गुंडावार,दोंतूलवारताई,सिम्पल डिखोळकर,स्मिताताई आत्रामसह परिसरातील व स्थानिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here