अहेरी : तालुक्यातील राजाराम अंतर्गत येत असलेल्या सूर्यापली येथील जय रावण व्हॉलीबॉल क्लब तर्फे भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेचे उदघाटन अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे यांच्याहस्ते करण्यात आली आहे.
सदर स्पर्धेसाठी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अधक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ ककंडालवार यांच्या कडून पारितोषिक देण्यात येत आहे.
त्यावेळी कार्यक्रमाचे अधक्ष म्हणून उपसरपंच रोशन कंबगोनीवार यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य सुरक्षा आकदर,संजवली अर्गेला,पूजा सोयाम,यशोदा आत्राम,सुखदेव आलाम,रमेश पोरतेट,माजी उप सरपंच संजय पोरतेट,नारायन सावकर,मुता पोरतेट,नरशिम्हा मुद्रकोल,जयराम आत्राम,सूर्यकांत आत्राम, राकेश तलांडे, रुपेश पोरतेट, तिरुपती दुर्गे,शामराव आलाम,भिमराव तलांडे,तसेच परिसरातील खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक 31000 हजार देण्यात येत आहे.तर द्वितीय पारितोषिक माजी सरपंच प्रमोद आत्राम 21000 हजार देण्यात येत आहे.तृतीय पारितोषिक माजी सभापती भास्कर तलांडे 11000हजार असे तीन पारितोषिक देण्यात येत आहे.या व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी परिसरातील विविध गावांतील खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभागी नोंदविला आहे.मंडळचे महेंद्र सिडाम,आशिष आत्राम,किशोर आलाम,महादेव आलामसह आदी उपस्थित होते.