अहेरी : तालुक्यातील महागाव येथील माता मंदिरकडे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा महागाव येते बोनालू कार्यक्रम मोठ्या उत्सहात साजरा करण्यासाठी येथील नागरिक ठरवले होते.मात्र त्या ग्रामस्थांना बोनालू कार्यक्रमा खर्चासाठी आर्थिक अडचण भासत होती.
आज महागाव येथील समस्त नागरिकांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या अहेरी येथील जनसंपर्क कार्यालय येते अजयभाऊ कंकडालवार यांची भेट माता मंदिर बांधकाम तसेच बोनालू कार्यक्रमासाठी अडचण भासत असलेल्या विषय सांगितले होते.
कंकडालवार यांनी नागरिकांची अडचण बघून माता मंदिर बांधकामासाठी तसेच येते होणाऱ्या बोनालू कार्यक्रमासाठी आर्थिक मदत केली आहे.तसेच त्यावेळी नागरिकांनी बोनालू कार्यक्रमाला कंकडालवार यांना निमंत्रण सुद्धा देण्यात आली आहे.त्यावेळी समस्त ग्रामस्थानी अजयभाऊ कंकडालवार यांची आभार मानले आहे.
यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,नगरसेवक प्रशांत गोडशेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगाम,ग्रामपंचायत सदस्य राजू दुर्गे,ग्रामपंचायत सदस्य वंदना दुर्गे,माजी सरपंच जयाबाई आलाम,नरेंद्र गर्गम,प्रवीण दुर्गे,कल्पना वेलादी,शोभा वेलादी,मनीषा रामटेके,निलाबाई लोखंडे,गौरुबाई मुंजमकार,पोचुबाई रामटेके,बांनय्या पानेम,प्रकाश दुर्गे,राकेश सडमेकसह स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महागाव येथील समस्त महिला – पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home अहेरी काँग्रेसनेते अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून माता मंदिर बांधकाम तसेच बोनालू कार्यक्रमाला आर्थिक मदत