अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील श्रीश्री हरिगुरुचाँद मतुआ मिशन आलापल्ली ( मोद्दूमाडगू ) येथील दरवर्षी प्रमाणे यंदाही मतुआधर्म महासम्मेलन तथा हरिनाम महायज्ञ कार्यक्रम आयोजित केले आहे.आयोजित कार्यक्रमला आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा संचालक अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती अजय कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांनी उपस्थित दर्शवून कार्यक्रमला मार्गदर्शन केले.
दरम्यान अजय कंकडालवार व हणमंतु मडावी यांनी मंदिरात विविध पूजा करून दर्शन घेतले.तसेच कार्यक्रमला वर्गणीही देण्यात आली.यावेळी कंकडालवार सोबत आलापल्ली ग्रामपंचायतचे माजी सरपंच अज्जू पठाण,नागेपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच लक्ष्मण कोडापे, पवार साहेब बुधावार सर, खोब्रागडे जी, आशिष पाटील ग्रामपंचायत सदस्य,निखिल मंडलसह स्थानिक काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.