Home अहेरी गॅस सिलेंडर पुरवठा वाहन व दुचाकीची धडक ‘वनमजूर ठार

गॅस सिलेंडर पुरवठा वाहन व दुचाकीची धडक ‘वनमजूर ठार

21
0

अहेरी : ग्रामीण भागात गॅस सिलेडर पुरवठा करणारे वाहन व विरुद्ध दिशेने येणारी दुचाकी याच्यात समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना कासमल्ली फाट्याजवळ जंगलात घडली.दुचाकी स्वर मृतक हा वनमजूर असल्याचे कळते.मृतक संतोष मडावी हा वनमजुरीचे काम करून आपल्या गावाकडे मेडपल्ली येथे दुचाकीने जात असता़ना विरुद्ध दिशेने गॅस सिलेंडर पुरवठा करणारे वाहन जब्बर धडक दिल्याने संतोष मडावी हा जागीच ठार झाला.

याची माहिती मेडपल्ली येथील सरपंच निलेश वेलादी यांना कळताच त्यांनी भ्रमनद्वनी द्वारे आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांना ताबडतोब कळविले.ही घटना माहिती होताच काँग्रेसनेते कंकडालवारांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन मृतक परिवाराची भेट घेत त्यांना धीर दिले.रात्री उशीर झाल्याने शव फ्रिजर मध्ये ठेवण्यास सांगितले व सकाळीच शव विच्छेदन करून शव घरी पोहचविण्यास वाहनाची व्यवस्था करून देत मदत केली.

यावेळी निलेश वेलादी सरपंच ग्रामपंचायत मेडपल्ली,शिवराम सिडाम निखिल वेलादी,आशिष पेंदाम,किसान मडावी,सुधाकर मडावी,महेंद्र वेलादी,अविनाश मडावी,शंकर बोस,पायल कोडापे, अशोक मेश्राम, शैलेश  जाकेवर,बगरू मडावी,विजू पल्लो,प्रशांत गोडसेलवार,कार्तिक तोगम,नरेश गर्गम,प्रमोद गोडसेलवार आदी कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here