अहेरी : गोसीखुर्द धरणातून सुरू असलेल्या मोठ्या विसर्गामुळे वैनगंगा नदीसह इतर नद्यांना आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या गावांना,शेतीला मोठा फटका बसला आहे.या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक मा.श्री.अजय कंकडालवार यांनी व्येकाटरावपेठा व अबानपल्ली परिसरातील पुरग्रस्त भागात भेट देऊन.गावकऱ्यांशी संवाद साधत त्यांना दिलासा दिला.
पूरग्रस्त भागात भेट घेऊन नुकसानीची माहिती घेत कंकडालवारांनी ग्रामस्थांशी संवाद साधून शेती पिकांचे नुकसान,घरांची पडझड,जनावरांचे हाल व अन्नधान्याचे नुकसान याबाबत गावकर्यांकडून सविस्तर माहिती घेतली.
नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी त्वरित सावधगिरी बाळगावी,जनावरे, धान्य व शेती साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे,अनावश्यक हालचाली व नदीकाठच्या भागात जाणे टाळावे,स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना कंकडालवारांनी दिल्या.
पूरपरिस्थितीची पाहणी करताना सोबत अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,नरेश गर्गम,प्रमोद गोडसेलवार आदी उपस्थित होते.
Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांची व्येकाटरावपेठा व अबानपल्ली परिसरातील पूरग्रस्त गावांना भेट...