आल्लापल्ली : येथील सतीश चंदू कोरेत यांचे दुःखद निधन झाले होते.या दुःखद निधनाची वार्ता आल्लापल्ली येथील स्थानिक कार्यकर्त्यांकडून कळताच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव अजयभाऊ कंकडालवार व काँग्रेसचे प्रदेश सचिव हणमंतू मडावी यांनी तात्काळ मृतकाचे घरी जाऊन मृतक कोरेत कुटुंबियांची सांत्वन करून त्यांना आर्थिक मदतही करण्यात आला.
तसेच काँग्रेस नेत्यांनी मृतकाचे अंत्यविधी कार्यक्रमालाही उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिले.आणि मृतकाचे पुढील कार्यक्रमासाठी आपल्या परीने आर्थिक सहकार्य करण्याचे सुद्धा कोरेत कुटुंबाला शब्द दिले.
यावेळी काँग्रेस नेते कंकडालवार व मडावी यांचे समवेत आल्लापल्ली ग्रामपंचायतचे माजी सरपंच अज्जू पठाण,संतोष तोडसाम, शैलेश परसावार,किशोर सडमेक, प्रकाश कोरेत,पत्रू मेडपल्लीवार, सुरेश कोरेत,बाबुराव कोरेत आदि उपस्तीत होते.
Home अहेरी काँग्रेस नेत्यांनी केली मृतक सतीश कोरेत यांचे कुटुंबियांची सांत्वन व अंत्यविधीला उपस्थिती