अहेरी : श्रीराम चौक आलापल्ली व अहेरी रोड,सिरोंचा पुलाजवळ दरवर्षी विश्वकर्मा जयंती उत्सव मोठ्या उत्सहात पार पाडले जात असतात.दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा विश्वकर्मा जयंती उत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या उत्सवाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थिती दर्शवून विधिवत पूजा अर्चना करून भगवान श्री विश्वकर्मा यांचे दर्शन घेतले.
यावेळी काँग्रेस नेते कंकडालवार यांनी भगवान श्री विश्वकर्मा चरणी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे म्हणून मनोभावे प्रार्थना केली.
यावेळी रेखा हणमंतु मडावी प्रशांत गोडसेलवार नगरपंचायत नगरसेवक अहेरी,कार्तिक तोगम माजी उपसरपंच,प्रमोद गोडसेलवार,प्रकाश दुर्गेसह स्थानिक आविसं,काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.