Home अहेरी भूमि अभिलेख अधिकार विभागाचे उपसंचालक मिसाळ व जि.प.माजी अध्यक्ष कंकडालवार यांच्या प्रमुख...

भूमि अभिलेख अधिकार विभागाचे उपसंचालक मिसाळ व जि.प.माजी अध्यक्ष कंकडालवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सनद वाटपाचे कार्यक्रम संपन्न

25
0

अहेरी : तालुक्यातील इंदाराम येथील नागरिकांना भूमी अभिलेख अधिकार विभागाचे नागपूरचे उपसंचालक लालसिंग मिसाळ व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सनद वाटप करण्यात आले.यावेळी इंदाराम येथील एकूण 95 लाभार्थ्यांना सनद वाटप करण्यात आले.या दरम्यान आलापल्ली वासियांचे प्रॉपर्टी कार्ड सबंधीचे निकाल निकाली काढण्याचे व प्रॉपर्टी कार्ड (मालकी हक्क) प्रदान करण्याचे भूमी अभिलेख उपसंचालक लालसिंग मिसाळ यांनी अपीलांर्थीचे सुनावणी घेतले तसेच आपिलार्थीना लवकरात लवकर मालकी हक्क प्रदान करू, असे आश्वासन दिले.संपूर्ण सनद वाटप प्रक्रियेचे कामकाज अहेरीचे भूमीअभिलेख उपअधीक्षक गुणवंत रणदिवे,सहारे,पंकज अंबोरे,साखरकर,बोरकर,तुषार निमजे यांनी पाहिले.

इंदाराम येथील सनद वाटप व आलापल्ली येथील अपिलार्थीचे सुनावणी दरम्यान माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,नरेंद्र गर्गम,प्रकाश दुर्गे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here