अहेरी : वेलगूर येथील कोमरय्या सुरमवार यांच्या तेरवी कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहून दुःखद प्रसंगी सुरमवार कुटुंबाला सांत्वन केले.
यावेळी त्यांच्या सोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव हणमंतू मडावी उपस्थित होते. कोमरय्या सुरमवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी ज्योती सुरमवार यांची प्रकृती खालावल्याने औषधोपचारासाठी अडचण भासत असल्याचे कळताच, अजयभाऊ कंकडालवार यांनी तत्काळ आर्थिक मदत करून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले.
या प्रसंगी हणमंतू मडावी साहेब,अजय नैताम,माजी जि.प. सदस्य भास्कर तलांडे, माजी सभापती सुरेखा आलाम,सरपंच सौ. किरण कोडापे,विलास मडावी,सत्यम निलम, जे.टी. मडावी, प्रमोद कोडापे, विनोद दुन्नालवार, पार्वती वेलादी, रोहित वेलादी, राजेश वेलादी, निलम सर, मनोज कोडापे, गोपाल सुरमवार, विनोद तलांडे,श्रीनिवास कोडापे, संदीप डोलगे, दादराव सडमेक,राकेश आत्राम,समया लिंगम आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्रामस्थांनी अजयभाऊंच्या संवेदनशीलतेचे आणि जनसेवेसाठीच्या तत्परतेचे कौतुक केले.





