सिरोंचा : तालुक्यातील नारायणपूर येथील पावसाळी हंगामातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोगस बियाण्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.श्रीराम कृषी केंद्राकडून धान बीज क्रमांक 1001 मागविण्यात आले असताना कृषी केंद्र संचालकांनी दिशाभूल करून 1010 क्रमांकाची बियाणे दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
या बियाण्याची पेरणी केल्यानंतर पिकात अपेक्षित उत्पादन मिळाले नसल्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.यासंदर्भात शेतकऱ्यांनी पूर्वीच तहसील कार्यालय व तालुका कृषी अधिकारी कार्यालयास निवेदन दिले होते. त्यानंतर कंपनीचे अधिकारी व कृषी विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा देखील केला.
मात्र,अनेक दिवस उलटूनही कंपनीकडून किंवा कृषी अधिकारी कार्यालयाकडून कोणतीही नुकसानभरपाई मिळाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे की, आठवडाभरात पीकनुकसान भरपाई न मिळाल्यास ते दि. 24 नोव्हेंबर 2025 पासून सिरोंचा तहसील कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन किंवा साखळी उपोषण छेडणार आहेत
Home सिरोंचा नारायणपूर येथील बाधित शेतकऱ्यांनी दिली तहसील व कृषी विभागाचे कार्यालयावर धडक..नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी...





