Home अहेरी वीर बाबुराव सडमेक मंडळ, चिरेपली(कोत्तागुडम) तर्फे भव्य खुले ग्रामिण व्हॉलीबॉल सामने

वीर बाबुराव सडमेक मंडळ, चिरेपली(कोत्तागुडम) तर्फे भव्य खुले ग्रामिण व्हॉलीबॉल सामने

2
0

अहेरी : तालुक्यातील राजाराम ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या कोत्तागुडम ( चिरेपल्ली ) येथे विर बाबुराव शेडमाके क्रिडा मंडळ कोत्तागुडम ( चिरेपल्ली ) द्वारे भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजित केले आहे.

व्हॉलीबॉल सामनेसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांचाकडून प्रथम पारितोषिक देण्यात आली.

द्वितीय पारितोषिक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव हणमंतू मडावी व वनरक्षक चिरेपल्ली गुरु टेकाम कडून देण्यात आली,तृतीय पारितोषिक पेरमिली ग्रामपंचायतचे सरपंच प्रमोद आत्राम यांचा कडून देण्यात आली आहे.

या व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन काँग्रेस नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा मार्गदर्शनात गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अजय नैताम यांचा हस्ते करण्यात आली आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी सभापती पंचायत समिती अहेरी भास्कर तलांडे हे होते.

यावेळी मंचावर रोशन कंबगोणीवार उपसरपंच राजाराम,रमेश पोरतेट ग्रामपंचायत सदस्य,माजी उपसरपंच भगवान मडावी,धर्मा पेंदाम,गुरुदास पेंदाम,लालू पेंदाम,मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ मडावी,सचिव रवींद्र सोयाम यांच्या सह समस्त गावकरी व क्रीडा प्रेमी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here