अहेरी टुडे न्युज नेटवर्क / अहेरी तालुका प्रतिनिधी ( Aheri )
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील कुमारी. सुनिता व्येंकटेश अरका या मुलीला (जी एन एम) नर्सिंगच्या शिक्षणासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील देओनील स्कूल ऑफ नर्सिंग, मूल येथे जायचे होते, तिथे तिला या महाविद्यालयात प्रवेश ही निश्चित झाले होते, परंतु तिची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे,तिचं कुटुंब रोजंदारी करून उदरनिर्वाह करीत आहे, ह्याही परिस्थितीत तिने आलापल्ली इथून 12 वीचं शिक्षण चांगल्या गुणवत्तापूर्ण पूर्ण केले आहे, पुढील शिक्षणासाठी तिला मूल येथे जायचे आहे परंतु आर्थिक अडचण निर्माण झाल्याने तिच्या कुटुंबातील सदस्य सर्व चिंतेत पडले होते, पण ही बाब गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या लक्षात येताच त्यांनी आलापल्ली येथील कु.सुनिता व्येंकटेश अरका या मुलीला (जी एन एम) नर्सिंगच्या शिक्षणासाठी दिली 40000/- ( चाळीस हजार ) रुपयांची आर्थिक मदत.त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आधार मिळाला आणि सुनीताच्या पुढील शिक्षणासाठी तसेच सर्वतोपरी पुन्हा मदत करण्याच आश्वासन सुध्दा राजे अंम्ब्रिशराव महाराज यांनी दिला.विशेष बाब म्हणजे अहेरी इस्टेट चे दानशूर राजे अंम्ब्रिशराव महाराज हे अनेकदा आपल्या दानवीर स्वभावाने आपल्या क्षेत्रातील चांगले शिक्षण घेण्यासाठी आर्थिक अडचणित असलेल्या अनेक मुला-मुलींना मदत करीत असतात आणि त्यांनी आतापर्यंत अनेक गरजुना आर्थिक मदत केली आहे.
ह्यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रीशराव आत्राम, दिलीप भाऊ सिडाम,राजेश्वरीताई तलांडे (ग्रामपंचायत कर्मचारी) तसेच विकास भाऊ तोडसाम, (राजे फोटोग्राफर) रवि भाऊ जोरीगलवार कुमारी.सुनिता अरका यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.