सिरोंचा : दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा तालुक्यातील चिंतारेऊला येथे आज श्री.महाकाली मातेची यात्रा मोठ्या उत्साहात व हजारो भाविकांच्या साक्षीने पार पडली.
या यात्रेत तेलंगणा, छत्तीसगड व महाराष्ट्रातील भक्त मोठ्या संख्येने येऊन महाकाली मातेजवळ नतमस्तक होऊन दर्शन घेत असतात.महाकाली मातेची या यात्रेला तालुक्यात अनन्य महत्व आहे.
या यात्रेत येणाऱ्या भाविक व भक्तासाठी गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी अन्नदान कार्यक्रम आयोजित केले होते.
या अन्नदानाची आस्वाद हजारो भाविक भक्तांनी घेतल्या.मंदिर कमिटीकडून सतत तीन दिवस अनेक विविध कार्यक्रम भक्तिमय वातावरण पार पडला.





