अहेरी टुडे न्युज नेटवर्क / तालुका प्रतिनिधी अहेरी ( Aheri )
अहेरी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडले असून दिनांक 29/4/2023 ला मतमोजणी झाली असून अहेरी विधानसभेत तिन्ही राष्ट्रीय पक्षाचे आजी माजी आमदार यांनी युती करून आदिवासी विद्यार्थी संघ तथा अजयभाऊ मित्र परिवार समर्पित उमेदवाराना कृषि उत्पन्न बाजार समितीतून बाहेर ठेवण्यासाठी खूप मोठी खेळी केले.मात्र यात पराभव स्वीकार करावा लागला असून राष्ट्रवादी पक्षाचे माजी मंत्री व विद्यमान आमदार श्री.धर्मरावबाबा आत्राम यांच्या सुपुत्र व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या बंधू श्री.हर्षवर्धन आत्राम यांनी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या रिंगणात उभे होते मात्र त्यांच्या पराभव झाला असून चर्चेच्या विषय बनला आहे.