Home अहेरी माजी जिल्हा परिषद सदस्या विजया विठ्ठलानी सह अनेकांनी राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या...

माजी जिल्हा परिषद सदस्या विजया विठ्ठलानी सह अनेकांनी राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या नेतृत्वाखाली भाजपात केला प्रवेश

104
0

अहेरी टुडे न्युज नेटवर्क / तालुका प्रतिनिधी ( Aheri )

आलापल्ली येथील माजी जिल्हा परिषद सदस्या तथा सामाजिक कार्यकर्त्या विजयाताई विठ्ठलानी सह देवी आत्राम, पुंगला उंदीरवाडे, सुशीला आत्राम, मधुकर रापर्तीवार, शंकर बंडावार तसेच बोरी येथील शेखर पुल्लीवार, अहेरी येथील महेश मामीडवार सह अहेरी तालुक्यातील अनेकांनी आज अहेरी येथील कन्यका मंदिर सभागृहात झालेल्या एका कार्यक्रमात माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत अधिकृत प्रवेश केला

        नव्याने प्रवेश केलेल्या सर्वांचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी भाजपाचा दुपट्टा टाकून, पुष्पगुच्छ देऊन पक्षात अधिकृत प्रवेश दिला, ह्यावेळी जेष्ठ नेते प्रकाश गुडेल्लीवार भाजपा अहेरी तालुका अध्यक्ष रवी नेलकुद्री, उपसरपंच विनोद अकंनपल्लीवार, नगरसेवक अमोल गुडेल्लीवार, भाजपा तालुका महामंत्री मुकेश नामेवार सह अहेरी तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here