सिरोंचा : गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष सतीश जवाजी यांच्या नेतृत्वाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमेटी जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे यांचा वाढदिवसानिमित्त धर्मापुरी येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय विध्यार्थ्यांना पाठयपुस्तक,पेन,पेन्सिल आणि चॉकलेट वाटून वाढदिवस कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केले.तसेच सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ व बिस्कीट वाटप केले.त्यानंतर सिरोंचा येथील मुख्य चौकात अन्न -दान करण्यात आले.तसेच तालुका काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याचा वाढदिवस मिठाई वाटूनही उत्सहात साजरा केले.
त्यावेळी माजी आमदार पेंटारामाजी तलांडी, माजी उपसरपंच रवीभाऊ सल्लम, एम.ए.अल्ली,शहराध्यक्ष अब्दुल सलाम,उपाध्यक्ष शंकर मंचरला,सरय्या सोनारी,मजीद अली, सडवली मेडिझेरला, समय्या चिलमूला,लक्ष्मण बोले, मुनाफ शेख,अजय कंकडालवार सोशल मीडिया समन्वयक संपत गोगुला,मोहनराव दुर्गम आदी काँग्रेस कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
Home सिरोंचा सिरोंचा येथील जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे यांचा वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम व उत्साहात साजरा