अहेरी : पेरमिली राजाराम जिल्हा परिषद क्षेत्रातील राष्ट्रवादी ( अजित पवार गटचे ) व विविध पक्षातील पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी आपल्या राष्ट्रवादी पक्षाला रामराम करीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात नुकताच प्रवेश केले.या पक्षप्रवेशात राष्ट्रवादीचे शैलेश जाकेवार,अंकुश जाकेवार,अविनाश मडावी,दिवाकर तलांडे,प्रणित कोडापे,अमित पल्लो, विजू पल्लो,शेखर तलाडी,शाहील मडावी,अजय वारसे,लक्ष्मण मडावी, अर्जुन वारसे,प्रवीण मडावी,समीर वेलादी,विश्वनाथ मेश्राम,सुरज मडावी,जोगा तलाडी,अक्षय सडमेक,भाष्कर पेंदाम,प्रमोद तलंडी,रोशन जाकेवार,बाजीराव तलंडी,अविनाश मेश्राम,प्रदीप मेश्राम,करण सडमेक,करण सडमेक,संपतराव तलंडी,विजय पल्लो,अर्जुन मडावी,दीपक मेश्राम,क्रिश वेलादी,सुरज मडावीसह अनेक मुख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या समावेश आहे.त्यांच्या पक्षातील अंतर्गत नाराजीला कंटाळून कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे हात धरले आहे.
राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश माजी जि.प.अध्यक्ष मा.श्री.अजयभाऊ कंकडलवार यांच्या जनसंपर्क कार्यालय अहेरी येथे पार पडले आहे.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव अजय कंकडालवार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव हनमंतू मडावी यांच्यावार विश्वास ठेवून पक्षा प्रवेश केल्याची सांगण्यात येत आहे.काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची काँग्रेसनेते अजयभाऊ कंकडालवार यांनी पक्षाचे दुप्पट्टे टाकून व पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत केले.
यावेळी निलेश वेलादी सरपंच मेळपल्ली,प्रमोद आत्राम माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य,अजय नैताम माजी जि.प.सदस्य,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी सह स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Home मुख्य बातम्या पेरमिली राजाराम जि.प.क्षेत्रातील राष्ट्रवादी व विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी धरले काँग्रेसची ‘हात’





