Home मुख्य बातम्या जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून आल्लापल्ली येथील अपघातग्रस्त चालकाला औषधोपचारासाठी आर्थिक मदत

जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून आल्लापल्ली येथील अपघातग्रस्त चालकाला औषधोपचारासाठी आर्थिक मदत

41
0

अहेरी : आल्लापल्ली येथील खाजगी वाहनाचे चालक संदीप गाडगे हे काल भाजीपाला आणण्यासाठी चंद्रपूर ला जाऊन आपल्या वाहनात भाजीपाला भरून आल्लापल्ली ला परत येत असतांना मुलचेरा जवळ गाडी अचानक पालटल्याने यात चालक संदीप गाडगे हे गंभीर जखमी झाले आहे.त्यांना तात्काळ उपचारासाठी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आला.

डॉक्टरांनी वाहनचालक संदीप गाडगे यांच्यावर उपचार केले.या अपघातात वाहन चालकाच्या हाताला तीन ठिकाणी फॅक्चर झाली आहे. यावर खाजगी दवाखान्यात औषध उपचारासाठी तीन लाख रुपये खर्च येणार आहे.त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची असल्याने त्यांना खाजगी दवाखान्यात उपचार घेण्यासाठी आर्थिक अडचण भासत आहे.

या अपघातग्रस्त चालकाची माहिती आविसं काँग्रेसचे युवा नेते व लोकप्रिय माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना कळताच त्यांनी चालक संदीप गाडगे यांची नातेवाईकांना अहेरी येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात बोलवून घेऊन त्यांचे आर्थिक अडचण जाणून घेतले. यावेळी अजयभाऊ कंकडालवार यांनी अपघातात गंभीर जखमी झालेल्या संदीप गाडगे यांना पुढील औषध उपचारासाठी आर्थिक मदत करण्यात आली आहे. यावेळी गाडगे परिवारातील सर्व सदस्यांनी अजयभाऊंची आभार मानले आहे.

अपघातग्रस्त चालक संदीप गाडगे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करतांना माजी जि.प.सदस्य अजय नैताम,नगरसेवक प्रशांत गोडशेलवार,स्वप्नील मडावी,नरेंद्र गर्गम,तिरुपती गड्डमवार,सुरज दुर्गे,हितेश्र्वर मडावी,आकाश गेडाम,हणमंतू जंगमवार,प्रकाश दुर्गेसह आविसं व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here