अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील आलापल्लीचा लाडका राजा गणेश मंडळ तर्फे गणेशोत्सवात विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. त्यात सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक या विषयांचे आधारावर विविध स्पर्धेचे आयोजन केले होते. गणेशोत्सवात घेण्यात आलेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम व आलापल्लीचा लाडका राजा गणेश मंडळ तर्फे मोफत स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र व वाचनालय चालवल्या जात आहे. या मार्गदर्शन केंद्रात अभ्यास करून व आलापल्ली येथील इतर विद्यार्थी यावर्षात विविध नोकर भरतीत यशस्वी झाले होते. यशस्वी विद्यार्थ्यांचा व त्यांचा पालकांचा सत्कार आलापल्लीच लाडका राजा गणेश मंडळ तर्फे सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाला आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी उदघाटक म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन करून पालक व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या मार्गदर्शन केंद्रातुन आलापल्ली येथील युवक अंकुश मडावी यांनी यशस्वी होऊन सध्या सोलापूर मध्ये ट्रेनिंग कॅम्पमध्ये ट्रेनिंग घेत आहे.पालकांचा सत्कार वेळी अंकुश मडावी यांना व्हिडीओ कॉलच्या माध्यमाने त्यांना शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड होते.
यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, अमित येणप्रेड्डीवार, रुपेश श्रीरामवार, राकेश सडमेक, प्रमोद गोडसेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मंडळातील सदस्य – गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.