एटापल्ली : भारतीय जनता पार्टी तालुका एटापल्ली तर्फे अतिदुर्गम व अविकासीत वागेझरी कसनसुर जारावंडी जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये दिनांक २९/६/२३ व ३०/६/२३ ला मोदी @९ अंतर्गत महाजनसमंपर्क अभियान राबविण्यात आले.या अभियाना मध्ये कसनसुर,शेवारी,घोटसूर,गुंडाम,पारपनगुडा,वागेझरी,हालेवारा,मवेली इत्यादी गावात भेट देऊन मोदी सरकारची ९ वर्षाचे विकासात्मक योजना व गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोकजी नेते साहेबांचे मंजूर केलेले काम घरोघरी सांगण्यात आले.महाजनसंपर्क दरम्यान वांगेझरी गावातील लोकांनी रस्त्याची समस्या सोडवायला प्रामुख्याने सांगितले तर कसन सुर येथिल नागरिकांनी पण्याची समस्या कडे लक्ष वेधले असता तुमच्या समस्या खासदार अशोक नेते यांच्याकडे मांडून प्रामुख्याने सोडविण्याचा प्रयत्न करणार असे.आदिवासी आघाडीचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष संदीपभाऊ कोरेत यांनी सांगितले
यावेळी उपस्थित तालुका अध्यक्ष विजय नल्लावार,आदिवासी आघाडीचे तालुकाध्यक्ष दामोदरजी नरोटे,अहेरी आदिवासी आघाडी तालुका अध्यक्ष गुरू मडावी, तोडसा ग्रामपंचायत सदस्य विनोद नरोटे,युवा मोर्चा कार्यकर्ते नितीन तोडेवार,हालेवारा शक्तीकेन्द्र प्रमुख प्रवीणभाऊ शेन्डे, वागेझरी शक्तीकेन्द्र प्रमुख मनोज कोवासे ईतर कार्यकर्ते उपस्थित होते.सदर अभियान मुक्कामी प्रवास करण्यात आला