Home अहेरी हालेवारा येथे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे बैठक संपन्न : बैठकीला काँग्रेसचे...

हालेवारा येथे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे बैठक संपन्न : बैठकीला काँग्रेसचे प्रदेश महासचिव कंकडालवार व प्रदेश सचिव मडावी यांची उपस्थिती

32
0

एटापल्ली : तालुक्यातील हालेवारा येथे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक मोठ्या थाटात पार पडली.या बैठकीला काँग्रेस पक्षाचे प्रदेश महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार व प्रदेश सचिव हणमंतू मडावी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

या बैठकीत आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली.तसेच संभाव्य उमेदवारांविषयी सुद्धा चर्चा करण्यात आली.या बैठकीला उपस्थित काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना काँग्रेस नेते कंकडालवार यांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले.यावेळी काँग्रेसचे स्थानिक व परिसरातील बुथनीय समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here