गडचिरोली :- गेल्या काही दिवसापासून पडत असलेल्या परतीच्या अवकाळी पावसाचा जोर सुरू आहे. अचानक झालेल्या या पावसामुळे कापणी तयार झालेल्या धानपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गावर मोठे संकट ओढवले आहे. शेतकऱ्यांनी मेहनतीने वाढवलेली पिके शिल्लक राहिली नाहीत, कापणीच्या तोंडावर झालेल्या या अवकाळी पावसामुळे फक्त धानच नव्हे तर सर्व शेतपिकांना आता फटका बसला आहे. मुख्य पीक धान असल्यामुळे त्याचे नुकसान सर्वाधिक झाले आहे. धानाच्या कडपा कुजल्या आहेत. पिके पाण्याखाली गेल्याने संपूर्ण हंगाम उद्वस्त झाला आहे. बळीराजा हवालदिल झाला आहे. अश्या परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणे अत्यंत गरजेचे असल्याने माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी महसूल मंत्री ना. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता ब्रम्हपुरी येथे भेट घेत चर्चा केली. व शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानाचे सरसकट भरपाई द्यावी, अशी मागणी केली.
यावेळी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ भांगडिया, माजी आमदार प्रा. अतुलजी देशकर, माजी आमदार सुधाकर कोहळे, अशोक भैय्या, गणेश तळवेकर, रोहित बोमावार, उपस्थित होते.
यावेळी महसूल मंत्री ना. चंद्रशेखरजी बावणकुळे साहेब म्हणाले की . आमचे सरकार हे शेतकरी कष्टकरी बळीराजाच सरकार आहे.शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. प्रत्येक शेतकऱ्याला आधार देऊन त्याच्या कष्टाला न्याय मिळवून देणे हेच आपले कर्तव्य आहे.शेतकऱ्यांच्या आयुष्याचा प्रत्येक घामाचा थेंब मोलाचा असून त्यांच्या नुकसानीकडे शासनाने तातडीने लक्ष दिले जाईल शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम पणे उभे राहतील . शासन आपलेच असल्याने बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी कोणतीही अडचण येणार नाही, आपले सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असे आश्वासन बावणकुळे साहेब यांनी दिली.
Home गडचिरोली अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत मिळण्याकरिता माजी आमदार डॉ....





