Home सिरोंचा आरोग्य विभागाचे कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आंदोलनाला सिरोंचा तालूका काँग्रेस पक्षाकडून जाहीर...

आरोग्य विभागाचे कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आंदोलनाला सिरोंचा तालूका काँग्रेस पक्षाकडून जाहीर पाठिंबा

6
0

सिरोंचा : सेवेत नियमित केलेल्या अध्यादेशाचे तात्काळ अंमलबजावणी सह विभिन्न मागण्यांना घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानात मागील अनेक वर्षांपासून  कंत्राटी रूपात सेवा देणारे  कंत्राटी अधिकारी व कर्मचारीवर्ग मागील 19 ऑगस्ट पासून अख्य राज्यात आणि तालूका स्तरावर बेमुदत आंदोलन करीत आहे.

सिरोंचा येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आंदोलन मंडपाला काल  तालूका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सतीश जवाजी व काँग्रेसचे युवा नेते व माजी उपसरपंच रवी सल्लम व इतर पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन त्यांचे मागण्या व समस्या जाणून घेतले.

यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रिकरण समिती व एकता संघ महाराष्ट्र राज्य शाखा सिरोंचाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळाने एकूण वीस मागण्या घेऊन आंदोलन सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी काँग्रेस पक्षाने केंद्र व राज्यसरकारने यावर लवकरात लवकर तोडगा काढून आरोग्य विभागाचे कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करून आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शविले.

यावेळी काँग्रेसचे तालूका अध्यक्ष जवाजी यांचेसोबत माजी उपसरपंच रवी सल्लम, सारय्या सोनारी, माजीद अली, शंकर मंचर्ला, सडवली मेडिझेरला, समय्या चिलमूला, संपत गोगुलासह आदी कांग्रेस कार्यकर्ते उपस्तित होते.

सरकारने राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास मुळातच आरोग्य सेवा अस्थीपिंजर ठरत असलेल्या या तालुक्यात आंदोलनाची तीव्र फटका बसणार असून त्यामुळे तालुक्यातील आरोग्य सेवा प्रभावित होण्याची शक्यता ही वर्तविण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here