सिरोंचा : आदिवासी विद्यार्थी संघांचे नेते,काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक आणि गडचिरोली जिल्हा परिषदेचे लोकप्रिय व यशस्वी माजी अध्यक्ष श्री.मा.अजयभाऊ कंकडालवार यांचा वाढदिवस 5 जुलै शनिवारीला असून त्यांच्या वाढदिवसा निमित्य त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांकडून सिरोंचा शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
काँग्रेस नेते कंकडालवारांचा वाढदिवसनिमित्त सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप तसेच शालेय विध्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक,पेन व चॉकलेट वाटपासह विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
उद्या सिरोंचा शहरांत काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांचे वाढदिवस कार्यक्रम मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येत असल्याने आयोजित या सर्व कार्यक्रमाना राष्ट्रीय काँग्रेस पक्ष,आदिवासी विध्यार्थी संघांचे सर्व आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते आजी – माजी सरपंच सदस्यांनी तसेच अजयभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित राहून लोकप्रिय नेत्याचे वाढदिवस कार्यक्रम यशस्वी करण्याचे आव्हान कंकडालवार मित्र परिवाराकडून करण्यात येत आहे.
📍 स्थळ : ग्रामीण रुग्णालय सिरोंचा येथे रुग्णांना फळवाटप
वेळ : 11 वाजता
तदनंतर वेळेनुसार टप्याटप्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन..!
🙏🙏🙏🙏🙏🙏
Home सिरोंचा उद्या सिरोंचा येथे काँग्रेस नेते कंकडालवार यांचा वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन