आलापल्ली : जिल्हा काँग्रेस अध्यक्ष(आदिवासी सेल) मा. हणमंतूजी मडावी साहेब यांची महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या सचिव पदावर नियुक्ती झाल्याबद्दल आलापल्ली ग्रामपंचायतचे माजी सरपंच अज्जू भाऊ पठाण व मित्र परिवाराकडून तसेच स्थानिक काँग्रेसचे पदाधिकाऱ्यानी मा.हणमंतूजी मडावी साहेब यांच्या निवासी स्थानी जावून त्यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार व अभिनंदन करण्यात आले.
अहेरी परिसरातील गोगरीब,अडचणीत सापडलेल्या नागरिकांसाठी मा.हणमंतूजी मडावी साहेब हे नेहमीच मदतीला धावून जातात. व विशेष म्हणजे या विभागात त्यांनी सहाय्यक उप वनसंरक्षक राहून सेवा ही बजावली त्यांची एक विशेष समाज उपयोगी कार्य या विभागात झालेली आहे.यांची नुकतीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव पदावर नियुक्ती झाल्याने कार्यकर्ते नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
यावेळी आलापल्लीतील काँग्रेस कार्यकर्ता माजी सरपंच अज्जू भाऊ पठाण,नागेपल्ली येथील प्रतिष्ठित नागरिक व महालक्ष्मी ट्रान्सपोर्ट चे संचालक सामाजिक कार्यकर्ता मा.अशोक भाऊ रापेल्लीवार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आलापल्ली चे सचिव मा. कार्तिक निमसरकार, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सरकाटे, सामाजिक कार्यकर्ते सिनु नामंनवार,राजअनिल पोचमपल्लीवार,फिरोज पठाण,हसन भाई शेख,सादिक भाई शेख,या वेळी उपस्थित होते.सर्वांनी मा.हणमंतूजी मडावी साहेब यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.