Home मुख्य बातम्या 2022 च्या पावसाळ्यात नुकसान झालेल्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या : अजयभाऊ कंकडालवार

2022 च्या पावसाळ्यात नुकसान झालेल्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या : अजयभाऊ कंकडालवार

97
0

अहेरी : तालुक्यातील 2022 मध्ये पावसाळ्यात पुराणेकहर केला होता.सर्वात जास्त फटका तालुक्यातील मोद्दूमडगू – आलापल्ली – नागेपल्लीसह इतर गावातील नागरिकांना बसला होता.महाराष्ट्र शासनाने परिस्थितीचा गांभीर्याने विचार करुन मदत निधी जाहीर केली.आणि महसूल विभागाला त्वरित पंचनामे करण्याचे आदेशाही दिली.महसूल विभागाकडून पंचनामे करण्यात आले.

2022 मध्ये आलेल्या पावसाळ्यात नुकसानग्रस्त ज्यांच्या घरात पुराचा पाणी घुसल्याने नुकसान ग्रस्त नागरीकांना अजूनही नुकसान भरपाई मिळाली नसल्यांची माहिती नुकसानग्रस्त नागरीकांनी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या पूरपीडित नागरिकांनी आज अहेरी येथील अजयभाऊ जनसंपर्क कार्यालयात भेट देऊन त्यांच्या अडचण बाबत सांगितले होते.

तालुक्यातील पूरपीडित नागरिकांची अडचण लक्षात घेऊन अजयभाऊ कंकडालवार यांनी अहेरी येथील तहसीलदार तथा तालुका दांडाधिकारी यांना भेट घेत.सांगितले”कि”तालुक्यातील पूरपीडित नुकसानग्रस्त नागरिकांना आपल्या विभागाकडून मदत”का”मिळाली नाही.अशी विचारणा केली.त्यावर तहसीलदार यांनी 50 टक्के लोकांना मदत निधी देण्यात आले असून 50 टक्के लोकांना लवकरच मदत देणार असल्याचे सांगितले.

“ज्या”नागरिकांची व घरांची खरोखरच नुकसान झालेली आहे.त्यांना वंचित ठेवू नये आणि लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी.अन्यथा तालुक्यातील आलापली,व्यंकटरावपेठा,बोरी,माहागाव,वांगेपल्ली,चिंचगुंडी, देवलमरी,आवलमरी,मोद्दूमाडगू, नागेपल्लीसह इतर पूरपीडित नुकसानग्रस्त नागरिकांना घेऊन तहसील कार्यालय समोर आंदोलन करण्यात येईल.अशी इशारा आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी तहसीलदारांना भेट घेत दिली आहे.

यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,माजी सदस्य सुनीता कुसनाके,माजी सभापती सुरेखा आलम, अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,राकेश सडमेकसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच पूरपीडित नुकसानग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here