मूलचेरा: तालुक्यातील येल्ला येथील भोई समाजाच्या माता मंदिराला भेट देऊन विधिवत पूजा करून मातेचे माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दर्शन घेतले व येल्ला येथील भोई समाजाच्या ग्रामस्थांनी माजी जि.प. तथा अहेरी बाजार समिती सभापती कंकडालवार यांनी गावात पोहचताच ग्रामस्थांनी कंकडालवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
भोई समाज बांधवांनी आपल्या समस्या कंकडालवार यांच्या समोर मांडल्या.अजय कंकडालवार यांनी भोई समाज बांधवांच्या समस्या ऐकून घेऊन ते सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे उपस्थित भोई समाज बांधवांना सांगितले.त्याचबरोबर उपस्थितांना भोई समाजाचा इतिहास समजावून सांगितले
भोई समाजाची उत्पत्ती व स्थिती भोई समाजाची उत्पत्ती त्रेता युगापासून असल्याची बसमाहिती प्राचीन ग्रंथातून आढळते.
भगवान रामचंद्र जेव्हा वनवासाला निघाले तेव्हा शरयु नदी किनारी तऱ्याचे काम करणारा भोई ज्याला उत्तर प्रदेशात केवट म्हणतात.”या”भोयाने रामचंद्राना पैलतीरी उतरविले.त्यानंतर व्दापार युगात मत्यसगंधा जी सत्यवती या नावाने ओळखली जाते तिच्यापासून व्यास ऋषी,पांडव व कौरव यांची उत्पत्ती झाली.ती मत्स्यगंधा ही भोई समाजातील होती.
त्यानंतर कलियुगात अनेक राजे राजवाडे यांच्या दरबारी पालख्या वाहणारे,मेणे वाहणारे अशा प्रकारे या समाजाचा उल्लेख ग्रंथातून आहेच.पण इतिहाराकारानी सुध्दा भोई समाजाची नोंद इतिहासात केलेली आहे.
“या”समाजातील लोकांची मुख्य कामे म्हणजे प्रवाशांना नदीपलीकडे नेणे-आणणे राजदरबारी पालख्या – मेणे – डोल्या वाहाणे व उपजिविकेचे साधन म्हणून मत्यसमारी करणे.
यादेशात अनेक सत्तांतरे होऊन गेली.मोगलाई – शिवशाही – पेशवाई या सर्व राज्यांच्या पदरी भोयांसाठी राखीव स्थान होते. इंग्रजांनी या देशावर दीडशे वर्षे राज्य केले.स्वातंत्र्यानंतर संस्थानिकांचे तनखे बंद झाले.आणि तेव्हापासून भोई समाजाचा राजाश्रय संपला व जैविक गरजा भागविण्यासाठी मिळेल तिथे नोकरी करणे या शिवाय या समाजाला पर्याय उरला नाही.
स्वातंत्र्य पूर्व काळात अन्न धान्य व जीवनाश्यक सर्व मालाची ने-आण गलबताने केली जात असे.अशा गलबतावर खलाशाची नोकरी करणे याला मुसूमखंडया असे संबोधिले जाई.मुंबई सारख्या जागतिक किर्तीच्या बंदरामध्ये परदेशातून आलेला माल उतरविण्यासाठी पडाव यांचा उपयोग केला जाई.या पडाव किंवा बाजीवर खलाशाचे काम करणे हे भोई समाजाच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन बनले होते. काळाच्या गतीनुसार गलबते पडावे संपली आधुनिक करणाच्या अजगराने आपले तोंड उघडले त्यामुळे पारंपरिक धंदे संपुष्टात आले.
मात्र आजही काही प्रमाणात भोई समाजातील माणसे मुंबई सारख्या बंदरात खलाश्याचे काम करीत आहेत.भोई समाजाची वैशिष्टये पुर्वीच्या काळी होडीतून,डोली,मेण्यातून श्रीमंतांच्या मुली, सुना,आया बहिणींची ने-आण अत्यंत काळजीपूर्वक व प्रामाणिकपणे करणे तसेच मालाची ने-आण नेकीने व निस्वार्थीपणे करणे असा हा सेवाभावी भोई समाज आजही आपले अस्तित्व टिकवून आहे.
तालुक्यातील येल्ला येथील भोई समाज माता मंदिराला भेट मातेचे दर्शन घेतले व भोई समाजाच्या नागरिकांशी संवाद साधताना आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी इतिहास समजावून सांगितले.
तसेच भोई समाज बांधवांशी विविध विषयावर चर्चा केली व आपल समाज हा एकजुटीने राहावे आणि माझ्याकडून जे काही मदत लागेल ति मदत करण्यास आपण तयार आहोत असे आश्वासन अजयभाऊंनी दिली.
यावेळी वांगेपलीचे सरपंच दिलीप मडावी, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम,नगर सेवक प्रशांत गोडशेलवार,येला ग्रामपंचायत सदस्य सौ.संध्याताई मडावी, येला ग्राम पंचायत सदस्य सौ आशाताई उराडे,नरेंद्र गर्गम, भिमाना,दिनेश मडावी,अजय नैताम,येला गावातील समस्त भोई समाज बांधव व महिला भगिणी तसेच गावचे प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते.
Home मुख्य बातम्या भोई समाजाची उत्पत्ती व स्थिती भोई समाजाची उत्पत्ती त्रेता युगापासून असल्याची बसमाहिती...