Home अहेरी गडचिरोली जिल्ह्यातील लोकप्रिय नेते अजय ककडलवार यांना दिल्ली येथे डॉक्टरेट पदवी…राष्ट्रवादी (...

गडचिरोली जिल्ह्यातील लोकप्रिय नेते अजय ककडलवार यांना दिल्ली येथे डॉक्टरेट पदवी…राष्ट्रवादी ( शरद पवार ) गटचे पदाधिकाऱ्यांकडून शाल-श्रीफळ देऊन सत्कार

1
0

अहेरी : सामाजिक कार्यात सातत्याने पुढाकार घेणारे,तळागाळातील गोरगरीब जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी तत्परतेने धावून जाणारे आणि जिल्ह्यात जनतेचे विश्वासू नेते म्हणून ओळख असलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष,अहेरी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तथा काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव मा.श्री.डॉ.अजयभाऊ ककडलवार यांना दिल्ली येथे डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.

या सन्मानामुळे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.या यशाबद्दल त्यांचा विशेष सत्कार आयोजित करण्यात आला.या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते( शरद पवार )यांचे विचार मार्गदर्शक मानणारे तसेच माजी मंत्री व विधानसभा गटनेते आमदार ( जयंत पाटील )यांचे निकटवर्तीय व निष्ठावंत पक्षसेवक श्री.बुधाजी सिडाम यांनी अजय ककडलवार यांचा अहेरी येथे भेट घेऊन शाल व श्रीफळ देऊन गौरव केला.

यावेळी नुकतेच शिक्षकी पेशातून फेब्रुवारी महिन्यात सेवानिवृत्त झालेले श्री.राजू आत्राम सर हेही उपस्थित होते.सामाजिक,शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ककडलवार यांना हा सन्मान मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.

त्यावेळी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी,कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थितांनी ककडलवार यांच्या पुढील सामाजिक व जनसेवेच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here