अहेरी : येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक,गोरगरीब जनतेच्या आधारवड मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या वाढदिवस निमित्त अहेरी शहरात विविध ठिकाणी मोठया उत्साहात पार पाडले.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षांची व आविसं,अजयभाऊ मित्र परिवारातील सर्व कार्यकर्ते – हितचिंतकांच्या उपस्थित अहेरी उपजिल्हा रुग्णालय येथील अजयभाऊ कंकडालवार यांच्या वाढदिवस निमित्त रुग्णांना फळ फाटप करण्यात आली आहे.तसेच अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम घेण्यात आली आहे.
यावेळी आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हाध्यक्ष हणमंतु मडावी,किष्ठापूर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अशोक येलमुले,आलापल्ली ग्रामपंचायतचे माजी सरपंच अज्जू पठाण,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,माजी सदस्य सुनीता कूसनाके,अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती गीताताई चालूरकर,नागेपल्ली ग्रामपंचायतचे माजी सरपंच सरोजा किशोर दुर्गे,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,राजाक पठाण,हनीफ शेख,विलास सडमेक,नरेश गर्गमसह स्थानिक आविसं,काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home अहेरी जननेता व यशस्वी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या वाढदिवसनिमित्त अहेरी उपजिल्हा रुग्णालय...