Home सिरोंचा माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या वाढदिवस निमित्त जाफ्राबाद व  टेकडा तल्ला येथील विध्यार्थ्यांना...

माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या वाढदिवस निमित्त जाफ्राबाद व  टेकडा तल्ला येथील विध्यार्थ्यांना पेन बुक वाटप

5
0

सिरोंचा : तालुक्यातील जाफ्राबाद व टेकडा तल्ला येथील आविसं,भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक अजयभाऊ कांकडालवार यांच्या वाढदिवस निमित्त गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी वृक्षारोपण,विध्यार्थ्यांना पेन बुक वाटप,गोरगरीब जनतेला अन्नधान्य वाटप तसेच काही जनतेला मदतीचा हात पण देण्यात आली आहे.

आज त्या निमित्त जाफ्राबाद व टेकडा तल्ला येथे प्राथमिक जि.प.शाळेतील विध्यार्थी विद्यार्थींना पेन,बुक वाटप करण्यात आली आहे.त्यावेळी विद्यार्थींन चेहऱ्यावर आनंदाचा वातावरण दिसून आले आहे.त्यावेळी शाळेतील विध्यार्थ्यांनी अजयभाऊ कंकडालवार यांना वाढदिवस शुभेच्छा दिले आहे.

यावेळी माजी उपसरपंच तिरुपती दुर्गम,जाफ्राबाद ग्रामपंचायतचे सदस्य महेंद्र दुर्गम,मदन कोंडागुर्ला,राजशेखर मूडमडीगेला,दिनेश तोकला,तोटावारसह स्थानिक आविसं,काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here