अहेरी : आदिवासी विद्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरीचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या नवनिर्मित जनसंपर्क कार्यालयाचे लोकार्पण सोहळा शुक्रवारला मोठ्या अहेरी येथे उत्साहात पार पडला.नवीन जनसंपर्क कार्यालयाचे गुरूवारी विधिवत पुजाअर्चा केल्यानंतर शुक्रवारपासून या कार्यालयातुन जनसंपर्क कार्याला सुरूवात करण्यात आली.माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार आणि माजी पंचायत समिती उपसभापती सौभाग्यवती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार यांच्या हस्ते पुजाअर्चा करून वास्तूपूजन करण्यात आले.सध्या अहेरी येथे त्यांच्या निवासस्थाना समोरच नवीन जनसंपर्क कार्यालयाचे बांधकाम करण्यात आले.अलिकडच्या काळापासून त्यांच्याकडे येणाऱ्या कार्यकर्त्यांची व नागरिकांची वर्दळ वाढल्यामुळे यापूर्वीची कार्यालयात जागा अपुरी पडत होती. त्यामुळे त्यांनी नवीन आणि सुसज्ज जनसंपर्क कार्यालयाचे बांधकाम केले.सध्या अजयभाऊ मित्र परिवाराकडून अहेरी विधानसभा क्षेत्रात सगळीकडे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत.अहेरी उपविभागातील अनेक ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांवरही त्यांच्या गटातील कार्यकर्त्यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे त्यांच्याकडे ये-जा करणारे कार्यकर्त्यांसह नागरिकांची वर्दळ वाढली आहे. त्यांच्याकडे येणाऱ्या कार्यकर्त्यांची आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सुसज्ज असे नवीन जनसंपर्क कार्यालयाचे बांधकाम करण्यात आल्याचे माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी सांगितले.
Home राजकीय माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांची नवनिर्मित जनसंपर्क कार्यालयाचे लोकार्पण सोहळा थाटात संपन्न