


सिरोंचा : आदिवासी विद्यार्थी संघांचे नेते,गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा समन्वयक अजयभाऊ कंकडालवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुका काँग्रेस कमिटी आणि आदिवासी विद्यार्थी संघांचे स्थानिक कार्यकर्त्यांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आला होता.
काँग्रेस नेते कंकडालवार यांचा वाढदिवसानिमित्त येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय विध्यार्थ्यांना पाठयपुस्तक, पेन, पेन्सिल आणि चॉकलेट वाटून वाढदिवस कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केले.तसेच येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ व बिस्कीट वाटप केले.तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस मिठाई वाटूनही उत्सहात साजरा केले.सिरोंचा शहरात काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांचा वाढदिवसाच्या निमित्त आयोजित विविध कार्यक्रमांना
यावेळी काँग्रेसचे जेष्ठानेते मंदा शंकर,सिरोंचा बाजार समिती संचालक मल्लिकार्जुन आकुला,काँग्रेस सिरोंचा तालुका अध्यक्ष सतीश जावजी,काँग्रेसनेते बानय्या जनगाम,संचालक नागराजू इंगली,मारुती गणपूरपवार,अजयभाऊ सोशल समन्वयक संपत गोगूला,गणेश रच्चवार,श्रीनिवास दुर्गम,वसू सपाट,सरय्या सोनारी,प्रभाकर,राकेश चुक्कावार,महेंद्रसह स्थानिक आविसं,काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.