Home अहेरी पेसा क्षेत्रातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा करणार : अजय कंकडालवार

पेसा क्षेत्रातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा करणार : अजय कंकडालवार

89
0

अहेरी : अनुसूचित जमाती-पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरतीबाबत शासनाच्या वित्त विभागाने दि.३ एप्रिल २०२३ रोजी अन्वये रिक्त पदांच्या ८० टक्के रिक्त पदे भरण्यास परवानगी दिली आहे. याशिवाय १० ऑगस्ट २०२३ रोजी स्थानिक स्तरावर त्या त्या जिल्ह्यात ही पदभरती घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.असे असताना गडचिरोली जिल्ह्यात ही पदभरती घेण्यासंदर्भात अद्याप हालचाली दिसत नाही.ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर घेण्यासाठी पाठपुरावा करणार असे आश्वासन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृउबा समितीचे सदस्य अजय कंकडलावार यांनी आदिवासी डिटीएड,बिएड कृती समितीला दिले. सदर समितीने या संदर्भात कंकडलावार यांना निवेदन दिले आहे.अनुसूचित जमाती-पेसा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी त्या-त्या जिल्ह्यातील उमेदवारच पात्र असल्याने त्यांच्या पदभरतीबाबत शासनाने दिलेली परवानगी विचारात घेवून कार्यवाही करणे आवश्यक आहे.पवित्र प्रणालीमार्फत अनुसूचित जमाती-पेसा मधील रिक्त पदे अन्य पदभरतीबरोबर न घेता स्वतंत्रपणे, लवकर घेण्यासाठी वित्त विभागाने मान्यता दिली आहे.त्यानंतर दि.१०.८.२०२३ च्या पत्रातून त्याबाबत गाईडही देण्यात आल्या. पण महिना होत आला तरी त्याबाबत हालचाली सुरू झाल्या नसल्याने आदिवासी बेरोजगार युवकांनी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडलावार यांना निवेदन दिले.TAIT-2022 चाचणी दिलेल्या ST-PESA उमेदवारांची माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सदर चाचणी (TAIT-2022) परीक्षा दिलेल्या उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार शैक्षणिक व व्यवसायिक अर्हता प्राप्त उमेदवारांची आपल्या जिल्हयातील पेसा क्षेत्रातील शासनाने परवानगी दिलेल्या रिक्त पदांच्या मर्यादेत नियुक्तीची कार्यवाही करावी.अशी मागणी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालववार यांना निवेदन देऊन केली आहे.

प्रमुख मागण्या

1.अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी अर्ज करतांना झालेल्या चुका दुरूस्ती करण्यासाठ
पर्याय उपलब्ध करून देणे.2.पेसा शिक्षक भरती प्रक्रिया तात्काळ राबविण्यात यावी.3.पदविधर शिक्षकांच्या रिक्त जागा 80% पदे सरळसेवेनी भरण्यात यावी.4.पेसा शिक्षक भरती रिक्त पदांचा तपशिल कागदोपत्री देण्यात यावा.5.CTET अपियर पात्रता धारकांना भरती प्रक्रियेमध्ये समावेश करण्यात यावा.6.पेसा क्षेत्रातील शिक्षक रिक्त पदांचा अनुशेष भरण्यात यावा.7.टिईटि घोटाळ्यातील उमेदवारांचे मूळ प्रमाणपत्र तपासूनच भरती प्रक्रियेमध्ये घेण्यात यावे.8.संबंधीत भरती प्रक्रीयेमध्ये समांतर आरक्षणाच्या जागा रिक्त राहिल्यास त्या जागा सर्वसाधारण करून समायोजन करण्यात यावे.

यावेळी निवेदन देतांना सुनील मडावी,विनोद मडावी,सायलू मडावी सरपंच खमंनचेरू,दिलीप मडावी सरपंच वांगेपल्ली,पेंदाम माजी सरपंच,प्रमोद कोडापे,विनोद दुलाम,प्रकाश दुर्गे,राकेश सडमेकसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here