Home अहेरी सुरजागड येते ओअदलपेन ठाकूरदेव  दर्शन पारंपरिक इलाका ग्रामसभा कडून जत्राचे आयोजन…अजय कंकडालवार...

सुरजागड येते ओअदलपेन ठाकूरदेव  दर्शन पारंपरिक इलाका ग्रामसभा कडून जत्राचे आयोजन…अजय कंकडालवार यांनी उपस्थित दर्शवून ठाकूरदेवची विविध पूजा करून घेतले दर्शन

22
0

एट्टापली : तालुक्यातील पुरसागोंदी ग्रामपंचायत अंतर्गत सूरजागड पहाडीवार ओअदलपेन ठाकूरदेव मंदिर आहे.येथे दर वर्षी आदिवासी बांधव व गैर आदिवासी बांधव मोठ्या उत्साहाने जत्राचे आयोजन करत असतात.जल जंगल जमीन व ग्रामसभा बाबतीत विचारमंथन करण्यात येतो.

५ जानेवारी ते ७ जानेवारी पर्यंत ठाकूरदेव जत्रा महोत्सव,पुजा व सांस्कृतिक संम्मेलनाचे आयोजन एट्टापट्टी पारंपरिक गोटुल समितिच्या वतीने करण्यात येते.ठाकूरदेव  आदिवासी बांधव प्रमुख दैवत मानत असता शेकडो वर्षांपासून परिसरातील लोक इथे पारंपरिकरित्या एकत्र येवुन विविध विषयावर चर्चा करत असतात.

या निमित्याने क्षेत्रातील आदिवासी बांधव व गैर आदिवासी बांधव एकत्र येतात व जत्रा आयोजन करतात.आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव मा.श्री.हनमंतू मडावी यांनी उपस्थित दर्शवून ठाकूरदेवची विविध पूजा करून दर्शन घेतले.

यावेळी संचालक सैनू गोटा,काँग्रेस नेते प्रज्वल नागूलवार,अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती सुरेखा आलम,भामरागड नगरपंचायतचे उपाध्यक्ष विष्णू मडावी,भामरागड काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्रभाकर मडावी,माजी जि.प.सदस्य सुनीता कूसनाके,राजू वड्डे माजी नगरपंचायत अध्यक्ष,दानू आत्राम माजी ग्रामपंचायत सदस्य,शामराव सडमेक,परमेश मडावी उपसरपंच ग्रामपंचायत मडवेल्ली,रामा महाका,भामरागड काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत बोगमी,स्वप्नील मडावी यांच्या सह इलाका पट्टीचे सर्व आदिवासी बांधव व काँग्रेस पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here