Home अहेरी सर्पदंशाने मृत पावलेल्या इसमाच्या कुटुंबाला काँग्रेस नेते कंकडालवार यांनी केली आर्थिक मदत

सर्पदंशाने मृत पावलेल्या इसमाच्या कुटुंबाला काँग्रेस नेते कंकडालवार यांनी केली आर्थिक मदत

11
0

अहेरी : तालुक्यातील देचली येथील मृतक युवक संजय विष्णू मुलकरी हे रोजचा सारखे सकाळी उठून ब्रश घेण्यासाठी गेले होते पायरीवर ठेऊन असलेले ब्रश घेण्याकरिता हात पुरवताच घराच्या भीतीला खालच्या बाजूला साप आहे म्हणून त्यांनी बघितले नसल्याने त्या सर्पाने चावा घेतला.सर्पाने चावा घेतला अशे कळताच आई व नातेवाईक जिमलगट्टा रुग्णालयात घेऊन घेले. डॉक्टराणी उपचाराला सुरुवात केली परंतु विष शरीर बर पसरल्याने अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात रेफर केले परंतु अहेरी येथील रुग्णालयात पोहोचताच डॉक्टराणी चेकअप करून संजयला मृत घोषित केले.

ही कार्यकर्त्यांकडून माहिती होताच आविसं काँग्रेसनेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी त्वरित उपजिल्हा रुग्णालय गाठले.शवविच्छेदन होत पर्यंत उपस्तिथी दर्शविली.शव घरी नेण्यासाठी तसेच होणाऱ्या अत्तविधीसाठी आर्थिक मदत करून माणुसकीचे दर्शन घडविले

यावेळी देचली ग्रामपंचायतचे सरपंच दिवाकर मडावी,सत्यम नीलम,आनंद जियाला,बशीर अहमद शेख,सलीम शेख,विनोद रामटेके,साई कुमरे,प्रमोद गोडसेलवारसह मृतकांचे आई वडील तसेच नातेवाईक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here