अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील काल श्रीराम नवमी निमित्त वनविभाग कर्मचाऱ्यांकडून सुद्धा अहेरी व आलापल्ली शहरात विविध कार्यक्रम आयोजित केले आहे.आलापल्ली येथील समस्त कर्मचारी वर्ग प्रकाष्ट घटक आलापल्ली वनविभाग तर्फे श्रीराम चौक आलापल्ली येथे महाप्रसाद कार्यक्रम आयोजित केली आहे.
या आयोजित महाप्रसाद कार्यक्रमाचे उदघाटन आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार व आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांचे हस्ते करण्यात आली आहे.
त्यावेळी अजय कंकडालवार यांनी वनविभाग कर्मचाऱ्यांना,समस्त जनतेला राम नवमीचा शुभेच्छा दिल्या,त्यावेळी महाप्रसाद स्थानिक नागरिक व भाविक मोठ्या संख्येने आस्वाद घेतले.कार्यक्रमचे अध्यक्ष म्हणून राहुल सिंह टेलिया सर प्रमुख पाहुणे म्हणून मिना सर,शिशुपाल पवार सर,मोहम्मद आझाद सर,भोयर सर,गणविर सर हे होते.
यावेळी स्थानिक आविसं,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक,भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.