Home मुख्य बातम्या मोद्दूमाडगू येथील नागरिकांनाची केलेल्या भाजप पक्ष प्रवेश बातमी बिनबुडाचे

मोद्दूमाडगू येथील नागरिकांनाची केलेल्या भाजप पक्ष प्रवेश बातमी बिनबुडाचे

55
0

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली अंतर्गत येत असलेल्या मोद्दूमडगू येथील नागरिक व महिला वर्गांनी काही दिवसा पूर्वी माजी पालकमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांनी देवी दर्शन साठी बोलवले म्हणून गेले होते.त्यांनी मोद्दूमडगू नागरिकांना व महिला वर्गांना भाजपाचे दुपट्टा टाकून पक्ष प्रवेश केला असल्याची खोटी बातमी प्रसारित केले आहे.

सदर माहिती आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या आदेशानुसार नागेपल्ली ग्रामपंचायत सरपंच लक्ष्मण कोडापे यांनी आज मोद्दूमडगू येतील नागरिकांनची भेट घेऊन माहिती जाणून घेतले भाजपा पक्ष प्रवेश हि बातमी खोटी असल्याचे नागरिकांनी सांगीतले.

त्यावेळी मोद्दूमडगू येथील नागरिक व महिला वर्गांनी सांगितले”कि”आम्ही सर्वजन एक कार्यक्रमाला बोलावले म्हणून गेले होतो.पण अश्या प्रकारे पक्षाचे दुप्पटे टाकून पक्षप्रवेश कार्यक्रम घेतील असे वाटले नाही.आम्ही युवा पिढी पासून आता पर्यंत आविसं अजयभाऊ समर्थक म्हणून राहिलो राहनार असे सांगून भाजपाने केलेली पक्ष प्रवेश बातमी बिनाबुडाचे म्हणून मोद्दूमडगू नागरिक – महिला वर्गांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here