अहेरी : दरवर्षी शारदा व दुर्गा नवरात्री पौर्णिमेला महर्षी वाल्मिकी यांची जयंती साजरी केली जाते.यंदाही मंगळवारी म्हणजे 07 ऑक्टोबरला रामायणाचे रचेते,महर्षी वाल्मिकी जयंती असल्याने अहेरी शहरात विविध ठिकाणी जयंती कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झालं.यंदा थोर महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती निमित्त अहेरी तालुक्यातील वेलगूर वार्ड नंबर एक येथील जयंती कार्यक्रम आयोजित केले आहे.
आयोजित वाल्मिकी जयंती कार्यक्रमला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक मा.श्री.अजय कंकडालवार यांचाकडून वर्गणी देण्यात आली आहे.सदर वर्गणी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती सौ.गीताताई चालूरकर यांचा हस्ते देण्यात आली.
यावेळी संजय बावणे,प्रशिक दुर्गे,रमेश मराठे,शंकर मराठे,दिलीप राऊत,देवानंद गदेकर,आनंद मराठे,पंचफुला कस्तुरे,आशा कस्तुरे,मंदा मराठे,आशा सातारे,मनाबाई राऊत,पूजा राऊत, जयश्री मंडरे सह स्थानिक कार्यकर्ते तसेच गावातील समस्त नागरिक उपस्थित होते.