Home मुख्य बातम्या शासकीय योजनांची जत्रा, महाराजास्व अभियान कार्यक्रम संपन्न : माजी जिल्हा परिषद अध्यक्ष...

शासकीय योजनांची जत्रा, महाराजास्व अभियान कार्यक्रम संपन्न : माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची प्रमुख उपस्थित

201
0

अहेरी टुडे न्युज नेटवर्क / अहेरी तालुका प्रतिनिधी ( Aheri )

अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील मुख्यमंत्री शासकीय योजना गतिमान अंमलबजवाणी अभियान अंतर्गत शासकीय योजनांची जत्रा महाराजास्व अभियान कार्यक्रम घेण्यात आली आहे.या अभियान कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून मार्गदर्शन केली.या कार्यक्रमा वेळी रेशन कार्ड,ट्रॅक्टर,इश्रम कार्ड प्रमाणपत्रचे माजी जि.प.अध्यक्षांचा शुभ हस्ते वितरण करण्यात आले.योजनांच्या जत्रेत नागरिकांची एकच गर्दी पहायला मिळाली.

शासनातर्फे आदिवासी बहुल भागातील नागरिकांना एकाच मंचावर विविध दाखले तसेच शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा महाराजस्व अभियान घेण्यात आली आहे.यावर्षी सुद्धा गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात महाराजस्व अभियान घेण्यात येत आहे.प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळेच या अभियानाला उत्सूर्फ प्रतिसाद असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी प्रमुख अतिथी स्थानावरून बोलत होते.हा कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून अहेरी उपविभागीय अधिकारी अंकितसर होते तर अध्यक्ष स्थानी कमलापूर ग्रामपंचायतचे सरपंच श्रीनिवास पेंदाम होते

यावेळी उपस्थित अहेरीचे तहसीलदार फारुख सर,अजय नैताम माजी जिल्हा परिषद सदस्य,श्रीनिवास पेंदाम ग्रामपंचायत सरपंच,किरणताई कोडापे ग्रामपंचायत सरपंच दमरांचा,प्रमोद कोडापे,नरेश गर्गम राकेश सडमेकसह कमलापूर गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here