Home सामाजिक भामरागड तालुक्यातील कोयर येथील कमरमुत्ते देवीच्या महापुजेला : अजय कंकडालवार यांची उपस्थिती

भामरागड तालुक्यातील कोयर येथील कमरमुत्ते देवीच्या महापुजेला : अजय कंकडालवार यांची उपस्थिती

35
0

भामरागड : प्रत्येक समाजाचा स्वतंत्र संस्कृती आहे.ती संस्कृती टिकविण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्नरत आहे.भामरागडसारख्या आदिवासीबहूल तालुक्यांतर्गत येणाऱ्या कोयर येथे दरवर्षी सहा परिवाराची कुलदैवत असलेल्या कमरमुत्ते देवीची महापूजा होते.या महापुजेसाठी महाराष्ट्रासह सीमावर्ती भागात असलेल्या छत्तीसगड राज्यातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होत कमरमुत्ते देवीचे दर्शन घेतले.यासाठी भामरागड तालुक्यातील लाहेरी,घोटपाडी,मुरंगल,परायणार,कोयर आदी गावांसह छत्तीसगड राज्यातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कोयर येथे कमरमुत्ते देवीचा ठाणा असल्याने दरवर्षी येथे महापूजेचे आयोजन करण्यात येते.विशेष बाब म्हणजे आदिवासी समाजामध्ये देवांच्या संख्येवरून त्यांचे गोत्र ओळखले जाते.ही देवी सहा देव परिवारातील असून सहा देव परिवारात ज्या आडनावांचा समावेश असते.त्याच कुटुंबातील सदस्य अधिकाधिक उपस्थित राहून पूजाअर्चा करतात.

तीन दिवशीय महापूजेदरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पहिल्या दिवशी सायंकाळी ४ वाजता देवीदेवतांचे आगमन झाल्यानंतर रात्री पारंपारिक रेला नृत्य व पाहुण्यांचे आगमन झाले.त्यानंतर रात्रभर विविध कार्यक्रमाचे
आयोजन करण्यात आले.

कोयर येथे आयोजन महापूजा कार्यक्रमाला आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांनी उपस्थिती दर्शवून सर्व देवीदेवतांचे विधीवात पूजन करून दर्शन घेतले आहे.दुसऱ्या दिवशी दिवसभर जत्रा भरविण्यात आली तर शेवटच्या दिवशी जत्रेचा समारोप करण्यात आला.

यावेळी भामरागड काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत भोगामी,भामरागड नगरपंचायतचे उपाध्यक्ष विष्णू मडावी,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,बालू भोगामी,कनू सडमेक,प्रभाकर मडावी,प्रवीण मोगर्कर,आकाश,जुरू पुंगाटी,रामाजी पुंगाटीसह परिसरातील आदिवासी बांधव तसेच स्थानिक आविसं काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here