अहेरी टुडे न्युज नेटवर्क / अहेरी तालुका प्रतिनिधी ( Aheri )
गडचिरोली : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून संघटनात्मक मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. अहेरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखपदी मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री गडचिरोली जिल्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील २८८ विधानसभा प्रमुखांची घोषणा आज केली. त्यामध्ये मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना अहेरी विधानसभा क्षेत्राची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.