Home मुख्य बातम्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय अंतर्गत कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांना कायम करून वेतनश्रेणी लागू...

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय अंतर्गत कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांना कायम करून वेतनश्रेणी लागू करा

61
0

अहेरी : कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय अंतर्गत कंत्राटी पद्धतीने काम करणारे सर्व कर्मचाऱ्यांनी आविस नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन सादर करून बालिका विद्यालय अंतर्गत कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून वेतनश्रेणी लागू करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याची विनंती केली.
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात कार्यरत मागणी रास्त असल्याने अजयभाऊ कंकडालवार यांनी कर्मचाऱ्यांची निवेदनाची दखल घेत कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून त्यांना वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी केली आहे.
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचे कर्मचाऱ्यांनी जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना दिलेल्या निवेदनात कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाची पाढा नमूद करतांना ,संदर्भ क्रमांक एक नुसार मुलींचे शिक्षण व उपक्रम अंतर्गत नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर सन 2005 मध्ये सुरु झालेल्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात कार्यरत कर्मचारी आपल्यासमोर निवेदन सादर करतो की, सन 2005 खाजगी व 2008 पासून महाराष्ट्र राज्यामध्ये कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सुरु आहे. आज महाराष्ट्रात 43 कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय कार्यरत आहे. या विद्यालयात शाळाबाह्य, अनाथ, एक पालक हयात असलेल्या घटस्फोटीत, परितक्याच्या मुली, अपंग पालकाच्या मुली, अपंग मुली, प्रकल्पग्रस्ताच्या मुली, अतिशय दुर्दम्य भागातील ज्या भागात शिक्षणाची पुरेसी संधी नाही अशा ठिकाणच्या मुली शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर जात असलेल्या मुली शिक्षण घेत आहे.

या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी मध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जाती, भटक्या जमाती विमुक्त जमाती व अल्पसंख्याक मुली आहेत. योजनेच्या फलश्रुतीचा आढावा घेतला असता 2008 पासून ते आज पर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये या विद्यालय मुळे मुलींच्या साक्षरतेचे प्रमाण वाढले आहे असुन शाळाबाह्य मुलींच्या प्रमाणात घट व बालविवाहाचे प्रमाण घटले आहे.

नियमित व गुणवत्तापूर्ण शिक्षणा बरोबरच या विद्यार्थीनी क्रीडा, संगीत, चित्रकला, विविध स्पर्धा परीक्षा, स्कॉलरशिप, सांस्कृतिक स्पर्धा राज्यस्तरापर्यंत नेत्रदीपक यश मिळवले आहे. प्रत्येक विद्यालयाचा 2013 पासून इयत्ता दहावी (SSC) परीक्षेचा १००% निकाल आहे. आपल्या तालुक्यातील विद्यार्थिनींनी बालकवी, सह्याद्री, नवज्योती पुरस्कार मिळवले आहेत. क्रीडा मध्ये आज मुली राज्य पातळीवरून राष्ट्रीय पातळीवर खेळत आहेत. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या विद्यार्थिनीवर जीवनपटावर आधारित चित्रपट निर्मिती झाली आहे. याशिवाय आज विद्यार्थिनी नुसत्यात सुशिक्षित झाल्या नसून त्या आज स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे आहेत. यामध्ये जालना जिल्हातील या विदयार्थीनी पीएसआय अधिकारी, पोलीस अधिकारी, डॉक्टर, इंजिनिअर, नर्स, बँक, अंगणवाडी, सेविका, सरकारी वा खाजगी कंपनी, डी-फॉर्मसी, ड्रेस डिझायनिंग या क्षेत्रासह काही मुलींनी स्वतःचे व्यवसाय देखील सुरु केले आहे. हे फक्त कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय मुळेच शक्य झाले आहे.

याचं सर्वस्वी यश त्या विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम अत्यंत निष्ठेने करणारे विद्यालयातील मुख्याध्यापिका, 6 वी ते 10 वी वर्गाना शिकवणारे पूर्णवेळ शिक्षिका, अंशकालीन शिक्षक, यांच्यासह विदयालय प्रशासनाला जाते. विद्यालयातील गृहप्रमुख आपल्या मुली याप्रमाणे त्यांचा सांभाळ करत आहे. या मुलींना घराप्रमाणे अन्न देण्याचे काम येथील स्वयंपाकी करत आहेत. मुलींची सुरक्षिता करिता चौकीदार व कार्यालयीन सर्व कामे शिपाई तसेच आर्थिक अभिलेखन लेखापाल असे प्रत्येक कर्मचारी आपापल्या जबाबदाऱ्या अत्यंत कर्तव्यदक्ष पणे 2005 पासून ते आज पर्यंत करत आहे.

2. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय आदर्श विद्यालय आहे. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय आज आदर्श शाळा चा दर्जा प्राप्त झालेला आहे. प्रत्येक स्पर्धा परीक्षा, नाटक, नाटिका, नृत्य, संगीत चित्रकला, विज्ञान प्रदर्शन, अपूर्व विज्ञान मेळावा, स्कॉलरशिप मध्ये तालुका असो की जिल्हा किंवा राज्य कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय चा संघ नेहमीच पुढे असतो. आज विद्यालयामध्ये आदर्श शाळा म्हणून भव्य असे इमारत, संगणक, प्रयोगशाळा, वाचनालय, विज्ञान प्रयोगशाळा, खेळाचे मैदान सर्व सुविधापूर्ण इमारत या ठिकाणी आहे. प्रत्येक राज्याचे व जिल्ह्याचे उपक्रम अतिशय प्रभावीपणे या ठिकाणी राबविले जातात. दरवर्षी शैक्षणिक सहल काढल्या जातात. नाविन्यपूर्ण उपक्रम या ठिकाणी घेतले जाते. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय मध्ये प्रवेश घेणारी विद्यार्थी अतिशय कोरी पाटी असते. या ठिकाणी आल्यानंतर तिला हातात पेन पकडण्यापासून तर शैक्षणिक क्षमता शंभर टक्के पूर्ण प्राप्त करण्यासाठी प्रयत्न या विद्यालयात केला जातो. अशा विविध वैविध्यपूर्ण गोष्टीमुळे आज कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय महाराष्ट्र मध्ये वेगळेच वलय निर्माण झालेले आहे. ही एक दर्जेदार शिक्षण देणारी संस्था म्हणुन नावारुपाला आलेली आहे.

३. विद्यालयास वारंवार भेटी व विद्यालयाचे मूल्यांकन केले जाते- जिल्हास्तरावर मा. जिल्हाधिकारी, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मा. शिक्षणाधिकारी, तर तालुकास्तरावर मा. तहसीलदार, मा. गटविकास अधिकारी, असलेल्या प्रमुख प्रशासकीय पदावरील व्यकती कडुन विदयालयाचे प्रशासन चालविले जाते. तालुका स्तरावर शासकीय प्रतिनिधी मा. गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, यांच्या सह वारंवार केंद्रप्रमुख, मानव विकास आयुक्त, राज्यस्तरीय अधिकारी, MHRD दिल्ली कडून विद्यालयास नेहमी भेटी झाल्या आहेत. सर्वानी विद्यालयाचे शिस्त, गुणवत्ता, स्वच्छता याचे कौतुक केले आहे. स्वच्छेतेचे पुरस्कार या विदयालयास मिळाले आहेत. सर्वांनी सुचवले आहे की यांना घडवणाऱ्या या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांचा सन्मान त्यांचा हक्क शासनाने दिला पाहिजे. पण कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील कार्यरत कर्मचारी नेहमी दुर्लक्षित राहिले आहेत.4. राज्य कार्यालयाकडे केजीबी कर्मचान्यांचा कायम संदर्भात आढावा घेतला जातो.

संदर्भ क्रमांक दोन व तीन नुसार मुद्दा नुसार कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे असा बैठकीमध्ये ठराव देखील घेण्यात आला होता आणि आम्हाला एमपीएससी कार्यालयाकडून आश्वासन देखील देण्यात आले होते. तेव्हापासून आम्ही राज्य कार्यालयाकडे आतुरतेने आतुरतेने वाट पाहत होतो की आम्हाला कायम करण्यात येईल. या आशेने वाट पाहत होतो आणि प्रत्येक नवीन येणाऱ्या शासन निर्णय त्यामध्ये आमचा मुद्दा असेलच, पण आमच्या वाटेला निराशा आली. आम्ही सतत 18 वर्षापासून निरंतर मनापासून अत्यंत निष्ठेने विद्यालयाची सेवा करत आहोत. तेव्हा आम्हाला पूर्ण विश्वास होता की आमचा निश्चित विचार होईल. पण कुठलाच विचार केला गेला नाही.

5. अत्यंत मोजके कर्मचारी आणि मानव विकास अंतर्गत वाढलेल्या वर्गाचा कामाचा-

संदर्भ क्रमांक सहा नुसार 2012 ला मानव विकास योजना सुरू झाली. तेव्हापासून नवीन दहावीचा वर्ग जोडला गेला आणि मुख्याध्यापिका नि गृहप्रमुख, शिक्षकांचे काम व सर्व कर्मचाऱ्यांचे काम वाढले काही शाळेवर तर दोनच शिक्षिका होत्या व अंशकालीन शिक्षक यांनी पूर्ण शाळा सांभाळले. वारंवार राज्यकार्यालयाला पत्र केले. पण राज्य कार्यालयाकडून फक्त रिक्त पदाचा आढावा घेतला जातो. पद भरती करण्यात आली नाही त्यामुळे मानव विकास कर्मचारी भरेपर्यंत सर्व काम तेवढ्याच मुख्याध्यापिका, पूर्णवेळ शिक्षिका, अंशकालीन शिक्षकांनी. पूर्ण वेळ अध्यापन करणे, स्पर्धा परीक्षेला मुली बसवणे. एसएससी चे सर्व काम करावे लागले. संदर्भीय पत्र क्रमांक नुसार मानवविकास अंतर्गत फक्त पूर्णवेळ शिक्षकाची | भरती करण्यात आलेली आहे. तेव्हा सुद्धा केजीबीवीची पदे भरली गेली नाही. त्यामुळे मानवी शिक्षक रुजू झाले व त्यांना देखील रिक्त सर्व शिक्षकांचे काम करावे लागले. मात्र स्वयंपाकी पद भरले गेले नाही त्यामुळे मुख्याध्यापिकांना, गृहप्रमुख, स्वयंपाकी यांना आज देखील अतिरिक्त काम करावे लागत आहे. आजही देखील आपल्या तालुक्यात खुप पदे रिक्त आहेत.

मुलींची संख्या वाढली तरी कोणीही तक्रार न करता सर्वांनी आपापल्या पद्धतीने निष्ठेने आपली कर्तव्य पार पाडत आहोत. मुख्याध्यापिका, गृहप्रमुख, पूर्ण शिक्षिका, अंशकालीन स्वयंपाक, चौकीदार, शिपाई, लेखापाल कर्मचारी तेवढ्याच निष्ठेने सर्वच मुलींना शिकवण्याचे व घडवण्याचे काम तेवढाच निष्ठेने पूर्ण केले आणि करत आहोत. मानव विकास शिक्षकांना देखील दहा वर्ष पूर्ण होत आहे. मानव विकास मिशन अंतर्गत शिक्षकांनी देखील केजीबीव्ही च्या सहा ते आठ वर्गाला रिक्त जागेवर तेवढ्याच निष्ठेने शिकवण्याचे काम केले आहे.

प्रकार-4 वस्तीगृहाची व्याप्ती वाढल्याने कामाचा व्याप वाढला. -2015 पासून राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा

6. अभियान अंतर्गत वस्तीग्रह सुरु करण्यात आले. इयत्ता नववी ते बारावी पर्यंत. त्या मुली देखील कस्तुरबा गांधी प्रकारे । वस्तीगृहामध्ये राहत होत्या. नववी दहावीच्या मुली देखील कस्तुरबा गांधी मध्ये शिक्षणघेत होत्या. तेव्हा नववी दहावीच्या वर्गामध्ये 40-45 असा पट होता. कार्यरत मुख्याध्यापिका, मानव विकास शिक्षिका व केजीबीवीतील शिक्षिका यांनी तेही काम स्वीकारले. लेखापाल सर्व स्वयंपाकी, चौकीदार, शिपाई तेवढ्याच निष्ठेने काम केले. कामाचा खूप व्याप वाढला. पण वेतन वाढत नव्हते ही खंत सतत मनामध्ये राहत होती. तेव्हा कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील १०० मुली, मानव विकासच्या ५० मुली आणि राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान च्या जवळपास १०० मुली अशा २५० मुली त्यांचे शिक्षण, त्यांचे सुरक्षितता सर्व जबाबदारी पार पाडत होते याची तक्रार आपल्याकडे अथवा राज्य कार्यालयाकडे केले नाही. कारण वाढलेल्या कामानं आम्ही थकत नव्हतो. आम्हाला वाटत होते आज नसता उद्या आमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि आम्हाला समान वेतन समान काम देऊन सन्मान व आमचा हक्क देण्यात येईल. पण तसे झाले नाही आजही देखील आपण चौकशी करावी की आपल्या जिल्ह्यामध्ये किती पद रिक्त आहेत व यांना अध्यापन कोण करते राज्य कार्यालयाने फक्त आकडे घेण्याचे काम केले. ७. महाराष्ट्र शासन कायम विनाअनुदानित तत्त्वावरील संदर्भ क्रमांक आठ नुसार सुरु असलेल्या शाळांना महाविद्यालयांना वर्ग तुकड्यांना अनुदान अस पात्र घोषित करून तेथील कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने अनुदान देऊन नियमित वेतनात सामावून घेतले. आम्ही कर्मचारी अतिशय तुटपुंज्या मानधनावर 2005 पासून तर आज पर्यंत काम करत आहोत. आमच्या ती मागून सुरु झालेल्या विनाअनुदानित शाळांना शासन विनाअनुदान शब्द काढुन अनुदान देते व मुलींच्या शिक्षणातील या महत्वपुर्ण व गुणवत्ता पूर्ण योजना असुनही आम्हाला अनुदान दिले जात नाही ही शोकांतिका आहे. कारण आमचा मुद्दा वर शासन दरबारी मांडला जात नाही. नेहमी आम्ही योजनेचे म्हणून हे हेटाळणी केली जाते. येथील कर्मचाऱ्यांना शाळांना कायमचा दर्जा देऊन कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी का लागू करण्यात येत नाही. 8. वस्तीशाळा चे समायोजन संदर्भ क्रमांक नऊ नुसार वस्ती शाळेतील निम शिक्षकांना जिल्हा परिषद प्राथमिक म्हणून सेवेत सामावून घेतले जाते. यामध्ये काही शिक्षक तर बारावी उत्तीर्ण देखील नव्हते अशा शिक्षकांना अप्रशिक्षितचा दर्जा देऊन त्यांना देखील शासन वेतनश्रेणी देतो व सेवांतर्गत त्यांचे डीएड करून घेतले जाते आमच्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय प्रत्येक शिक्षक हा उच्चशिक्षित आहे. केवळ पदवीधारक व बीएड उच्चशिक्षित एम.ए., एमस्सी, एम.फील व उच्च पदवी पीएचडी धारक आहेत. मग एवढी शैक्षणिक पात्रता असताना देखील आम्ही वेतनश्रेणी पासून वंचित राहतो आणि अप्रशिक्षित शिक्षकाला वेतन श्रेणी दिली जाते हा शासनाचा न्याय आहे का त्यांचा प्रस्ताव देखील जिल्हा परिषद मार्फत दाखल केला जातो मग आमचा प्रस्ताव आपल्या स्थापन करून का सादर केला जाऊ शकत नाही विनंती आहे की आमचाही प्रस्ताव आपल्या स्तरावरून राज्य शासन दरबारी पाठवण्यात यावा आणि आम्हाला न्याय मिळवून देण्यात यावे.

09. इतर सेवेतील कंत्राटी व रोजंदारी व्यक्तीना कायम केले जाते सात संदर्भ क्रमांक दहा नवे नुकतेच महानगरपालिका मध्ये ठोक मानधनावर कार्यरत कर्मचाऱ्यांना कायमसेवेत सामावून घेण्यात आले त्यांचाअनुभव तर केवळ पाच ते सात वर्षाचा होता आमची तर सेवा पंधरा-अठरा वर्षे झालेली आहे मग आमचा सेवेमध्ये का विचार केला जात नाही याचे उत्तर एकच आहे की आमची बाजू मांडणाऱ्या दखल घेतली जात नाही.

9. भरती प्रक्रिया – मा. जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या कमिटी मार्फत योग्य त्या नियमाच्या अधिन राहुन तसेव वर्तमानपत्रात जाहिरात देऊन लेखी, तोंडी परिक्षा घेऊन शासन मान्य बिंदुनियमावली नुसार व रोष्टर नुसार पुर्ण शैक्षणिक पात्रता धारक असलेल्या कर्मचारी यांची भरती या विदयालयात करण्यात आलेली आहे. शासनाने ठरवुन दिलेले शैक्षणिक निकष यातील सर्व कर्मचारी यांनी पुर्ण केलेले आहेत.

विदयालयातील सर्व 06 वी ते 10 वी पर्यतच्या शिक्षकांनी त्यांना असलेली सर्व गुणवत्तवाढीसाठी आवश्यक सर्व प्रशिक्षणे, अविरत सारखी ऑनलाईन प्रशिक्षणे यासह SSC पेपर तपासणी, त्याच प्रमाणे निवडणुक ची राष्ट्रीय कर्तव्ये पार पाडलेली आहेत.

10. मॉडल -3 परत घेण्यासाठी गगन बाबडा ता. कोल्हापुर येथील यापुर्वी करण्यात आलेले मॉडेल -3 अयशस्वी झाले असुन मा. जिल्हाधिकारी यांनी पुन्हा प्रकार 2 मध्ये परत सुरु करण्याचा प्रस्ताव मा. राज्य प्रकल्प संचालक, मुंबई यांच्या कडे पाठविला आहे. या वरुन मुली शिक्षणाकरीता बाहेर जात असल्याने त्यांच्या गुणवत्तेवरही त्याचा परिणाम झाल्याचे त्यात नमुद करण्यात आलेले आहे. 05 जुन 1 2023 च्या राज्य स्तरावरील बैठकीत जिल्हा समन्वयकांनी प्रकार-2 मध्ये या विदयालयाचे समायोजन करावे असे सूचविले आहे.

केजीबीव्ही मध्ये सर्व सुविधा असतांना, मुली सुरक्षित असतांना शिक्षणासाठी बाहेर पाठविणे हे पालकांच्या पचनी पडत नाही. त्यास पालकांचाही विरोध आहे. सर्व केजीबीव्ही मध्ये शाळेची सुविधा असतांना व बाहेरील विदयार्थी/ विदयार्थीनी येथे प्रवेश देऊन दर्जेदार व सुविधायुक्त शैक्षणिक वातावरणाचा लाभ बाहेरील मुले/मुलींना होऊन एक मोठे शैक्षणिक केंद्र तयार होऊ शकते.

11. केजीबीव्हीमध्येच सहशिक्षणाची सोय करणे बाबत नवोदया विदयालयाच्या धर्तीवर या विदयालयाची निर्मिती करण्यात आलेली असुन त्या प्रमाणे केजीबीव्ही विदयालय 06 वी ते 12 पर्यंत उच्चीकरण करुन एकत्र मुलामुर्तीच् शिक्षण नवोदयाप्रमाणे सुरु करण्यात यावे. बहुतांश केजीबीव्ही ठिकाणी वसतीगृहाच्या निर्मिती झालेल्या आहेत किंवा मुलांचे वसतीगृह निर्माण करता येतील. यातुन ऊसतोड कामगांराच्या मुलांचा व स्थलांतरीत पालकांच्या मुलांचा प्रश्न कमी होण्यास मदत होईल संदर्भ क्रमांक 11 नुसार महाराष्ट्र राज्य कार्यालय यांनी मॉडल तीन चा विषयानुसार सहशिक्षणालाही मुर्त स्वरुप येईल. यापूर्वी मॉडेल दोन मध्ये इयत्ता 06 वी ते 10 वी पर्यंत शाळा झाल्यात सर्व कर्मचारी शिक्षकांचे समायोजन होणार आहे इयत्ता 09 वी 10 वी चे समायोजन झाल्यामुळे व केजीबीव्हीतील रिक्त जागा या मुळे मानव विकास शिक्षक/ शिक्षिकासह अंशकालीन शिक्षकांना पूर्णवेळ करता येणे शक्य होऊन विदयार्थी व विदयार्थीनीच्या सर्वागीण विकास होणार आहे. शिक्षक समायोजनाची सर्व आश्वासन आम्हालाराज्यस्तरावर पाच जूनच्या बैठकीत देण्यात आली होती. त्यामुळे आम्ही मॉडेल 2 च्या अनुदानाची वाट

बघत होतो. अद्यापही आम्हाला मॉडेल दोनचे पत्र मिळाले नाही व त्याप्रमाणे वेतनही मिळाले नाही

मध्येच मॉडेल दोन न होता मॉडेल तीन करावा असा विचार सुरु आहे. मा.राज्य प्रकल्प संचालक यांचे पत्र

काढण्यात आलं म्हणजे याचा अर्थ असा आहे की आम्हाला कोणतीच किंमत नाहीये, आमचा कोणता

सन्मान नाहीये शाळाबाह्य मुलींना शिकवतांना आता आम्हाला शाळाबाह्य करायचा शासनाचा विचार चालू

आहे ही फार अत्यंत संतोष जनक बाब आहे. आम्ही कंत्राटी आहोत म्हणून आमची हे हेटाळणी करणे, आम्हाला कुठेही उचलून टाकून देणे, आम्ही माणसं नाहीत का? आमचे शिक्षण आम्ही उच्च् शैक्षणिक पात्रता धारक आणि उच्च शिक्षित नाहीयेत का? मग आमचा विचार करताना असा विचार केला जातो की आवश्यकतेनुसार समायोजन करण्यात येईल असे या पत्रात सांगीतले असुन त्यामुळे विदयालयात मध्ये फार असंतोष निर्माण झालेला आहे आणि ही बाब आम्हाला मान्य नाही.

त्यामुळे भारतीय संविधानाने दिलेल्या समता समानता न्याय या मूल्यांचा विचार करून आम्हाला आमच्या पंधरा ते सोळा वर्षे सेवेचा व निष्ठेने केलेल्या कामाचा विचार करून आम्हाला कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय प्रकार 2 व 4 तील सर्व कार्यरत व मानव विकास मिशन अंतर्गत सर्व शिक्षकांना सेवेत सामावून घेऊन वेतनश्रेणी लागू करावी व कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाला ला कायमच्या शाळेचा दर्जा द्यावा व येथे सहशिक्षणाची सोय करण्यात यावी.

आमच्या मागण्याचा सहानभुतीपुर्वक विचार करुन गेल्या जवळपास 18 वर्षा पासुन कार्यरत असलेल्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय अंतर्गत कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांना कायम करून वेतनश्रेणी लागू करावी अशी विनंती कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांना कायम करून वेतनश्रेणी शासनाकडून करून देण्यात यावी अशी निवेदन आविस नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना देऊन मागणी केली.

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचे कर्मचाऱ्यांनी जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना निवेदन देतांना माजी जि.प.सदस्य अजय नैताम,माजी प.स.सभापती भास्कर तलांडे,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी,कु.डी.वाय.ढवस,कु.एम.बी.बंड,कु.पी.एन.बेठेकर,कु.एच. डी.उराडे,कु.आर एल.नवरेती,कु.व्ही.सी.येलेश्वर,कु.बी.जी.मेश्राम,कु. एस.एल.पानम,कु.पी.एस.ढवळे,कु.जे.एस.कोरेत,कु.एस.वाय.गजभिये,कु.पी.ए.कम्बगोनीवार,कु.एच.पी.वेस्कडे,श्र.भी.जी.एल.दंडीकुवार,पी.ए.येलमुलेसह कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील सर्व कर्मचारी वृद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here