Home अहेरी काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या आंदोलनाची दखल घेऊन

काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या आंदोलनाची दखल घेऊन

17
0

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली ते सिरोंचा व आलापल्ली ते भामरागड मार्गावर पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे.या ठिकाणी नागरिकांना अवागमन करण्यासाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे केली आहे.

अहेरी तालुक्यातील अनेक विकासकामे सुरू आहे.आलापल्ली ते सिरोंचा व आलापल्ली ते भामरागड मार्गावर पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे.सदर काम पर्यायी रस्ते तयार न करताच सुरू करण्यात आल्याने पावसाळ्यात परिसरातील नागरीकांना नाहक त्रास सहन करावं लगत आहे.

परिसरातील नागरिकांना रहदारीसाठी व आरोग्य सुविधेकरीता तालुका व जिल्हास्तरावर जाणे कठीण झाले आहे.माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी नागरिकांची अडचण लक्षात घेऊन या दोन राष्ट्रीय महामार्गची पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्यात यावी म्हणून जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मागणी केली होती तसेच आंदोलनाची इशारा पण दिले होते.

काँग्रेसनेते कंकडालवार यांच्या निवेदनांची दखल घेऊन आज अहेरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकांचा उपस्थितीत पोलीस स्टेशनमध्ये या दोन राष्ट्रीय महामार्गच्या अभियंत्यांना बोलावून बैठक घेण्यात आली आहे.सदर बैठक माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार व आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी यांच्या प्रमुख उपस्थित बैठक पार पाडले आहे.

बैठकित राष्ट्रीय महामार्ग विभागाची समंधित अधिकाऱ्यांनी येत्या 12 आगस्ट पर्यंत आलापल्ली ते सिरोंचा व आलापल्ली ते भामरागड मार्गाची गाड्या निघेल यासारख रस्ता व्यवस्था करून देईल अशी समंधित अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले आहे.या 12 आगस्ट पर्यंत हा दोन महामार्गची समंधित ठिकाणी तात्पुरता स्वरूपात डायवर्षन न केल्यास 8 आगस्टला भामरागड व सिरोंचा महामार्गवार लोकशाही पद्धतीने मोठा चक्काजम आंदोलन करण्यात येईल अशी काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी बैठकीत समंधित अधिकाऱ्यांना सांगितले आहे.

यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी,आसिफ पठान पत्रकार पेरमल्ली,अशोक येलामुले माजी ग्रामपंचायत उपसरपंच,कार्तिक तोगम माजी ग्रामपंचायत उपसरपंच मरपल्ली,नरेश गर्गम,प्रकाश दुर्गे,प्रमोद गोडसेलवारसह स्थानिक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here