अहेरी : मे महिन्यात उभारलेले रस्ते आणि कलवट काही महिन्यांतच उखडून जायचं, रस्त्यावर जिकडे -तिकडे खड्यांचे साम्राज्य,सगळीकडे अपूर्ण अवस्थेततल्या बांधकामे आणि यामुळे नागरिकांना दररोज नाहक त्रास सहन करावं लागायचं,नेमकं हे सगळं कसं काय म्हंटल तर विकासकामांमध्ये लुटालूट?असं संतप्त सवाल जनतेकडून नेहमी उमटायचं!
अहेरीत निकृष्ट कामगिरीचा जणुकाही कळसच गाठला होता. यावर रामबाण उपाय म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा.श्री.अजय कंकडालंवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर धडाकेबाज हल्लाबोल करीत चक्क ८ सप्टेंबरला गडअहेरी बामणी फाट्यावर चक्काजाम आंदोलन उभं करण्याचं गंभीर इशारा दिला होतं.
कुंभकर्ण झोपेत असलेल्या विभागाने झोपेतून जाग होतं आंदोलनापूर्वीच दखल घेत काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांना लेखी पत्र देत येत्या १५ दिवसांत रस्त्यांचे उर्वरित बांधकाम आणि खड्डे बुजवण्याचे कामाला सुरुवात केली कामांना गती देण्याचे आश्वासन दिली आहे.अखेर खड्डे बुजावण्याची कामालाही सुरवात करण्यात आली.
त्यामुळे काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांनी आज होऊ घातलेल्या चक्काजाम आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देत असल्याची माहिती त्यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
Home मुख्य बातम्या काँग्रेसनेते कंकडालवारांचा आंदोलनाचं इशाऱ्याची दखल घेत कामाला सुरुवात : पंधरा दिवसात काम...